दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेले आरोपी गजाआड.मुंढवा पोलीस तपास पथकची कामगिरी…तलवार,कोयता,लोखंडी रॉड जप्त,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
मुंढवा येथील झेड कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम दरोडा टाकुन लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. ही कारवाई मुंढवा परिसरातील झे़ड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला असलेल्या कच्च्या रस्त्यालगत गुरुवारी (दि.8) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास केली.

मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी दि. ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा. मुंढवा पोलीस ठाणे कडील रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, तपास पथक अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, पाहिजे / फरारी आरोपी शोध तसेच गुन्हे प्रतिबंधक करणेकरीता पेट्रोलिंग करून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना देवून पेट्रोलींग कामी रवाना केले.

पेट्रोलिंग करत असताना रात्रौ २३ / १० वा. चे सुमारास लोणकर चौक, केशवनगर भागामध्ये पेट्रोलींग चालू असतांना पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली “झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंपाचे मागील बाजुस कच्च्या रस्त्यालगत अंधारात काही मुले थांबलेली असून, काहीतरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे तयारीत आहेत” अशी बातमी प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांना दिली असता त्यांनी बातमीची खातरजमा करून, बातमीप्रमाणे प्रकार मिळून आलेस योग्य ती कायदेशीर ठोस कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.त्याप्रमाणे घटनास्थळी आडबाजूस थोड्या अंतरावर थांबून, कानोसा घेवून खातरजमा केली असता “आज पंपाची सारी कॅश लुटायचीच, अजुन थोडी लोकांची ये-जा कमी झाली की निघु ” अशा प्रकारची चर्चा चालू असल्याने सदर इसमांचा पेट्रोलपंचावर दरोडा घालण्याचा विचार असल्याची खात्री झाली.

तेव्हा सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार यांचे इशाऱ्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेणेसाठी दोन्ही बाजुने येवून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चाहूल लागल्याने ते पळून जाणेचे तयारीत असतानाच चार इसम मिळून आले व इतर तिन इसमांनी अंधाराचा फायदा घेत मैदानातून दिसेल त्या दिशेने पळ काढला, मिळून आलेल्या इसम हे पोलीस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आलेने त्यांना त्यांचे ताब्यात घेवून नाव व पत्ता विचारले असता
१) हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी, वय १९ वर्षे, रा. लोणकर वस्ती चौक गल्ली नं. ३, केशवनगर मुंढवा पुणे.
२) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे, वय १९ वर्षे, रा. मयुरेश्वर कॉलनी नागपुरे यांची बिल्डींग दत्त मंदीराजवळ जांभळे प्लॉट केशवनगर मुंढवा पुणे.
३ तेजस ऊर्फ सन्नी अश्विन पिल्ले, वय २० वर्षे, रा. व्हॅल्यू शाळेशेजारी शिंदेवस्ती केशवनगर पुणे.
४) शशांक श्रीकांत नागवेकर, वय २० वर्षे, रा. सुशिल सिध्दी सोसायटी फलॅट नं. ३९, हनुमान नगर रेणुकामाता मंदीराजवळ केशवनगर मुंढवा पुणे.
तसेच ०३ इसम पळुन गेले असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी वरील नमुद इसमांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये तलवार, लोखंडी कोयता, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी पाईप, मिरची पुड असलेली पिशवी, नारंगी रंगाची रस्सी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यातील इसमांना विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंप उशीरा रात्री लोकांची ये-जा कमी झालेवर पंपावर जावून दिवसभराची जमा असलेली रक्कम लुटून घेवून जाण्याची आखणी व तयारी केली असल्याचे सांगितले त्यांना पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलीस ठाणे येथे घेवून येवून गुन्हा रजि. नंबर ५२/२०२४ भा.दं.वि. कलम ३९९, ४०२, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.
अटक आरोपींचे पुर्व रेकॉर्ड :-
१) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे वय १९ वर्षे, रा. शेख यांचे खोलीत ससाणे कॉलनी, केशवनगर मुंढवा पुणे
याचे विरुद्ध दखलपात्र ०४ गुन्हे अदखलपात्र ०२ गुन्हे.
२) हर्षवर्धन मोहन रड्डे / रेड्डी वय १८ वर्षे रा. लोणकर चौक केशवनगर मुंढवा पुणे याचे विरुद्ध दखलपात्र १३
गुन्हे.
३) तेजस ऊर्फ सनी अश्वीन पिल्ले वय १९ वर्षे रा. शिंदेवस्ती केशवनगर मुंढवा पुणे. याचे विरुद्ध दखलपात्र ०१
गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.
४) शशांक श्रीकांत नागवेकर वय २० वर्षे रा. फ्लॅट नं. ३९ पाचवा मजला सुशील सिध्दीक सोसा हनुमाननगर
केशवनगर मुंढवा पुणे यांचे विरुद्ध दखलपात्र ०२ गुन्हे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, विलास सुतार, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, पोलीस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, सहा. पोलीस फौजदार, संतोष जगताप, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे, राहूल मोरे, मोहन सारुक, दिपक कदम, प्रमोद जगताप, सचिन पाटील, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे यांनी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
