७ वर्षापासुन फरार असलेले आरोपीला युनिट १ , गुन्हे शाखा , चे ताब्यात.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक ०८/१०/२०२१ – मारामारीच्या गुन्ह्यात ७ वर्षापासुन पाहिजे असलेला गुन्हेगार युनिट १ , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद .

ACS POLICE NEWS ONLINE PORTAL

दि .२६/०७/२०१५ रोजी पुना व्हेज नॉनव्हेज हॉटेल समोर उरळी देवाची पुणे येथे फिर्यादी विशाल विलास चौधरी रा . उरळी देवाची हे सदर ठिकाणी ५ ते ६ अनोळखी इसम एका व्यक्तीस मारहाण करति असताना फिर्यादी पाहावयास गेले असता काही कारण नसताना सदर ५ ते ६ अनोळखी इसमांनी फिर्यादीसही डोक्यात , तोंडावर , मानेवर दगडाने मारहाण केली म्हणुन आरोपी दिपक राठोड , राहुल क्षिरसागर , राहुल रंधवे व त्याचे इतर साथिदार यांचेवर लोणीकाळभोर पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक २७३/२०१७ भादवि कलम १४३ , १४८ , १४९ , ३२४ , ३३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . त्यापैकी काही आरोपी दाखल गुन्हयांत अटक करण्यात आले होते सदर गुन्ह्यात आरोपी राहुल क्षिरसागर हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०७ वर्षापासुन फरार होता . दि .०८ / १० / २०२१ रोजी युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट -१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत ७ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे राहुल क्षिरसागर हा त्याच्या आजीला भेटण्यासाठी मांगडेवाडी येथे येणार आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून परवानगीने युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राहुल संजय क्षिरसागर वय २३ वर्षे रा . जुनी पाण्याची टाकी जवळ , मांगडेवाडी कात्रज , पुणे . असे असल्याचे सांगितले . त्याचेकडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्हयाचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेवुन तपास करता त्याने दाखल • गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबुल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे . सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न , मारामारी , दरोडयाची तयारी असे एकुण ३ गुन्हे भारती विदयापीठ * बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत . .

सदरची कामगिरी श्रीमती भाग्यश्री नयटके ( अति . कार्यभार ) अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे- १/२ श्री लक्ष्मण बो यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी पोलीस पोलीस अंमलदार अमोल पवार , अजय थो इम्रान शेख , तुषार माळवदकर यांनी केली आहे .

( शैलेश संखे ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ , गुन्हे शाखा पुणे शहर .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *