आयुक्तांच्या हस्ते कोंढवा पोलीस ठाणेकडील नवीन इमारतीचे उदघाटन.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक ०७/१०/२०२१ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या हस्ते कोंढवा पोलीस ठाणेकडील नूतन इमारतीचे उद्घाटन .

दि . ०७/१०/२०२१ रोजी कोढवा पोलीस ठाणे सुसज्ज नुतन इमारतीचे उद्घाटन मा . अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर याचे हस्ते पार पडले . कार्यक्रमासाठी मा.नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त , मा . नम्रता पाटील पो . उपायुक्त , परि ०५ , मा . राजेंद्र गलांडे सहा . पोलीस आयुक्त वानवडी विभाग उपस्थित होते .

याप्रसंगी नुतन वास्तू बांधकामास सहकार्य करणारे जहांगीर दोराबजी अमित गडोक , ब्रिजेंद्र कुमार सिंह , परेश राघवानी , किरण देसाई , खुजेन नगरवाला , अबिद सय्यद , नानासाहेब मरळ , स्वप्निल मासाळ , समित शहा , भाऊसाहेब लोखंडे यांचा सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला . तसेच पुणे महानगरपालिकेचे मान्यवर नगरसेवक गफूर पठाण , विरसेन जगताप , श्रीमती रंजना टिळेकर , सौ . नंदा लोणकर , संजय घुले , श्री . साईनाथ बाबर , सौ . संगीता ठोसर , सौ हसिना इनामदार माजी नगरसेवक रईस सुडंके , सामाजिक कार्यकते हाजी फिरोज शेख हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक , मा.नम्रता पाटील पोउपायुक्त परि ५ पुणे शहर यांनी केले . मा . अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे यांनी सदर नुतन इमारतीचे उद्घाटन केले व पाहणी केली तसेच त्याच्या भाषाणामध्ये पुणे शहरातील पोलीस ठाणेकडील इमारतीमध्ये नागरिकाच्या दृष्टीने अधिक चांगल्या सोयी सुविधा करणार असल्याचे सांगितले . पुणे शहर पोलीस दलास पुण्यातील सुजाण नागरीक वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत असल्याचे त्यांनी त्याच्या भाषणात नमुद केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक देव , आभार प्रदर्शन मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक देव , आभार प्रदर्शन मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी केले .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *