बसमधील गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी ताब्यात
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक -०४/०८/२०२१ युनिट ४ , गुन्हे शाखा , पुणे शहर बसमधील गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी ताब्यात
ONLINE PORTAL NEWS
बसमधील गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे मोबाईल चोरणारी तीन जणांची टोळी खराडी बायपास चंदननगर पुणे येथे चोरी करण्याचे उद्देशाने थांबलेले असले बाबत खात्रीशीर माहीती गुन्हे शाखा युनिट -४ कडील पोहवा ३२८७ दीपक भुजबळ व पो.ना. ६६०५ सुरेंद्र साबळे यांना मिळाली . मा . पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी सपोनि संदिप जमदाडे , पोउपनि जयदीप पाटील , पोहवा ३२८७ भुजबळ , पोना ६६०५ साबळे , पोना ३८६४ भलचिम , पोना ७४५४ खुनवे , पोशि ८२२४ शेलार , पोशि १००४४ सागर वाघमारे यांचे पथक तयार करुन सुचना देवुन तात्काळ मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी रवाना केले . खराडी बायपास या ठिकाणी बसमधुन चो – या करणारे तीन इसम नामे १ ) राहुल बाबु गायकवाड वय- ३० वर्षे , रा . ई १ बिल्डिंग , खोली नं ९२ , पिंगळे वस्ती , पासपोर्ट ऑफिस समोर , मुंढवा पुणे २ ) सनि बाबु गायकवाड वय- ३२ वर्षे , रा . ई १ बिल्डिंग , खोली नं ६२ , पिंगळे वस्ती , पासपोर्ट ऑफिस समोर , मुंढवा पुणे ३ ) गुंडप्पा हणुमंत कवलदार वय- ३१ वर्षे , रा . ई १ बिल्डिंग , खोली नं ५२ , पिंगळे वस्ती , पासपोर्ट ऑफिस समोर , मुंढवा पुणे यांना युनिट -४ कडील पथकाने शिताफिने ताब्यात घेतले . त्यांचे ताब्यात वेगवेगळ्या कंपनीचे ०७ मोबाईल हँडसेट ४१,००० / – रु किंमतीचे मिळुन आले . त्यांच्या ताब्यात मिळुन आलेले मोबाईल त्यांनी बसमधुन गर्दीचा फायदा घेवुन चोरी केल्याचे कबुल केले आहे . नमुद ईसमांचे ताब्यात मिळुन आलेला विवो कंपनीच्या वाय ९५ हा मोबाईल विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . २२०/२०२१ भादवी कलम ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करुन विमानतळ पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे . नमुद आरोपींनी अशा प्रकारे बसमधील गर्दीचा फायदा घेवुन बरेच गुन्हे केले असल्याची दाट शक्यता असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे .
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक श्री जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे , पोलीस उप निरीक्षक जयदीप पाटील , पोलीस अंमलदार दिपक भुजबळ , सुरेंद्र साबळे , प्रविण भालचिम , राकेश खुनवे , अशोक शेलार , सागर वाघमारे यांनी केली आहे .
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008