लोणीकंद पोलिसांची कामगिरी

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – ०६/०८/२०२१ लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर खुनाच्या गुन्हयात सहा महिन्यांपासुन तसेच दरोडयाची पुर्व तयारी व शस्त्र अधिनियम गुन्हयांत पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद

ONLINE PORTAL NEWS

लोणीकंद पोलीस स्टेशन मधील मौजे लोणीकंद गावचे हद्दीत दि .०९ / ०२ / २०२१ रोजी ११/५० वा . चे सुमारास एच.डी.एफ.सी. बॅकेचे ए.टी.एम. समोर अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन इसम नामे सचिन नानासाहेब शिंदे वय .२९ वर्षे , रा.लोणीकंद ता.हवेली जि.पुणे यांस त्याचे पाठीमागुन येऊन पिस्तोलाने गोळीबार करुन त्याचा खुन केलेला आहे . वगैरे हकिगत वरुन लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ८०/२०२१ भा.द.वि. कलम ३०२,१२० ( ब ) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर गुन्हयात सहा महिन्यांपासुन पाहिजे असलेला . पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर ३६०/२०२१ आर्म अॅक्ट ३२५ अन्वये दाखल असेलल्या गुन्हयातील पाहिजे असलेला तसेच गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर ने दरोडयाचे तयारीत असलेल्या गुन्हेगारांवर लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल केलेला गुन्हा रजि . नंबर ३५०/२०२१ भा.द.वि. कलम ३९९ वगैरे गुन्हयामध्ये पाहिजे असलेला रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे प्रविण ऊर्फ अजय राजेंद्र माकर रा . वाघोली गायरान ता.हवेली जि.पुणे मुळ रा.न्हावरा , ता.शिरुर , जि.पुणे हा सदर गुन्हे करुन फरार होता . सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने लोणीकंद पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , गजानन पवार सो यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी सुरज किरण गोरे व तपास पथकातील स्टाफ हे लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस उप – निरीक्षक सुरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना गोपनीय बातमी मिळाली की , वरील गुन्हयामध्ये पाहिजे असलेला आरोपी नामे प्रविण ऊर्फ अजय राजेंद्र माकर हा सांगवी सांडस फाटा ता . हवेली जि . पुणे येथे येणार आहे . सदर बातमीवरुन आरोपीताचा तपास पथकातील स्टाफने पाठलाग करुन पुढील तपासकामी ताब्यात घेतले आहे .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा अप्पर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , श्री.नामदेवराव चव्हाण , मा.पोलीस उप आयुक्त परीमंडळ – ०४.श्री.पंकज देशमुख , मा.सहा.पो.आयुक्त , येरवडा विभाग , श्री . किशोर जाधव , लोणीकंद पोलीस स्टेशन , व.पो.निरी.श्री.गजानन पवार , पो.निरी . तटकरे यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप – निरीक्षक सुरज किरणगोरे , सहा.पो.फौज.मोहन वाळके , पो.ना.अजित फरांदे , पोना.कैलास साळुके , पो.ना.विनायक साळवे , पोलीस अंमलदार समीर पिलाणे , सागर कडु , बाळासाहेब तनपुरे यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *