भाजपाचे नगरसेवक धिरज घाटे यांच्या हत्येचा कट उघडकीस , ३ जणांना अटक.

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दि . ०८/०९/२०२१ पुणे शहरातील नगरसेवकांचे हत्तेचा कट उघडकीस गुन्हे शाखा , युनिट -३ , ची कारवाई

पुणे महानगर पालिकेचे वार्ड क्र .२९ मधील नगरसेवक श्री.धिरज घाटे हे दिनांक ०३/०९ /२०२१ दुपारी ०३/०० वा ते ०५/०० वा चे सुमारास आपला कार्यकर्ता अमर आवळे यांचेसह शास्त्री रोड वरील नवी पेठतील , हॉटेल शेफ़ान येथे चहा पिण्यासाठी गेले असता धिरज घाटे यांचा जुना कार्यकर्ता विकी ऊर्फ वितुल क्षिरसागर याने त्याचे कार्यकर्ते त्याच्या बरोबर येत नाहीत किंवा त्याच्या बरोबर संपर्क ठेवत नाहीत या गोष्टीचा राग मनात धरुन व आगामी पुणे महानगर पालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवणुकी मध्ये विकी ऊर्फ वितुल क्षिरसागर याचा भाऊ राकेश क्षिरसागर हा सहज निवडुन यावा या करिता आपले चार ते पाच साथीदारांना जमवुन नगरसेवक श्री धिरज घाटे यांचा खुन करण्याचा कट रचुन प्रत्यक्ष शेफ़ान हॉटेल येथे श्री धिरज घाटे यांच्यावर हल्ला करण्या करीता आले असता , श्री धिरज घाटे यांचे सोबत कार्यकर्ते असल्याने हल्ला करता आला नाही . श्री धिरज घाटे यांना विकी ऊर्फ वितुल क्षिरसागर याचे व त्यांचे सोबतील इसमांचे संशयास्पद हालचालींचा संशय आल्याने तेथुन निघुन गेले . विकी ऊर्फ वितुल क्षिरसागर याचे हालचाली संशयास्पद आसल्याने सदर हॉटेलचे सीसीसटीव्ही फुटेज पाहुन खात्री केली असता विकी ऊर्फ वितुल क्षिरसागर हा त्याचे सोबत पाच ते सहा साथीदार जमवुन श्री धिरज घाटे यांचा खुन करण्याचा कट रचुन हल्ला करण्यासाठी आल्याची खात्री झाल्याने नगरसेवक श्री धिरज घाटे यांनी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिका यांशी संपर्क करुन गुन्हे शाखा . युनिट -३ येथे येवुन इसम नामे

१ ) विकी उर्फ वितुल वामन क्षिरसागर . रा . सानेगुरुजी नगर , अंबीलओढा कॉलनी , पुणे

२ ) मनोज संभाजी पाटोळे , रा . सानेगुरुजी नगर , अंबीलओढा कॉलनी , पुणे

यांचे व त्याचे सोबतील तीन ते चार साथीदार यांचे विरुध्द फिर्याद दिल्याने विश्रामबाग पोलीस ठाणे येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर दाखल गुन्ह्यांचे अनुषंगाने मा पोलीस सह आयुक्त , मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे , मा सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ . पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट -३ व युनिट -४ कडील अधिकारी व अंमलदार यांची टिम करुन एकत्रीत कारवाई करीत असताना नमुद आरोपींचा शोध घेता दिनांक ०७ /०९/ २०२१ रोजी आरोपी क्र .१ व २ हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी त्यांचे साथीदारासह श्री.धिरज घाटे यांचे खुनाचा कट रचल्याचे कबुल केले आहे . त्यांचे इतर साथीदार यांचा शोध घेत असताना तिसरा साथीदार महेश इंद्रजीत आगलावे , वय -२५ वर्षे , रा ,५४ एच.पी. लोहीया नगर , म्हसोबा मंदिरा शेजरी , पुणे हा मिळुन आल्याने त्यालासुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे . सदर मिळुन आले आरोपीतांना ताब्यात घेवुन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे . गुन्ह्यांत निष्पन्न इतर आरोपींचा शोध घेत आहे .

सदरची कामगिरी , पोलीस आयुक्त पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , पुणे शहर श्री . डॉ.रविंद्र शिसवे पोलीस उप – आयुक्त , गुन्हे पुणे शहर श्री . श्रीनिवास घाडगे , सहा.पोलीस आयुक्त . गुन्हे २ , श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . अभय महाजन , पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे , जयदीप पाटील व पोलीस अंमलदार- महेश निंबाळकर , राजेंद्र मारणे , संतोष क्षिरसागर , रामदास गोणते , विल्सन डिसोझा , सोनम नेवसे , कल्पेश बनसोडे , प्रकाश कटटे , राकेश टेकवडे , दिपक क्षिरसागर , ज्ञानेश्वर चित्ते , संजिव कळंबे , भाग्यश्री वाघमारे , महेंद्र पवार , स्वप्नील कांबळे , दत्ता फुलसंदर , सुरेंद्र साबळे यांनी केली आहे .

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -३ . गुन्हे शाखा.पुणे शहर .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *