पुणे गुन्हा शाखाची कारवाई:शुक्रवार पेठेतील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
गुन्हे शाखा अंतर्गत जनसेवा भोजनालय पाहिला मजला शुक्रवार पेठ पुणे येथे गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर संयुक्त कारवाई,
पुणेः शुक्रवार पेठेतील मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! ६० जणांना घेतले ताब्यात, १ लाखांची रोकड, ४७ मोबाईल जप्त,
पुणे : मटका किंग नंदू नाईक याच्या शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालय येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालून ६० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नंदू नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डे आहेत. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर हे जुगार अड्डे काही दिवस बंद राहतात. त्यानंतर पुन्हा सुरु होतात. शुक्रवारी पोलिसांनी ज्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्याच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ऑगस्टमध्ये धाड टाकून २ लाख रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य जप्त केले होते.
त्यानंतर आता हा जुगार अड्डा पुन्हा सुरु असल्याचे आढळून आले. नंदू नाईक याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.गुन्हे शाखेने घातलेल्या या छाप्यात पोलिसांनी ६० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच १ लाख २५० रुपये रोख, ४७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अतिमेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथके, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथ, युनिट १ व ५ च्या पथकाने केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
