मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई सिंहगड पोलीस स्टेशन

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक- १७/०७/२०२१ सिंहगड पोलीस स्टेशन पुणे शहर मा . पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारीला आणखीन एक दणका समाजात दहशत निर्माण करणा – या कुख्यात गुंड महेश ऊर्फ बंटी पवार टोळीवर पुन्हा एकदा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई

ONLINE PORTAL NEWS

सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीत तुकाईनगर येथे राहणारा व स्वतःला भाई समजुन समाजात दशहत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार महेश ऊर्फ बंटी प्रकाश पवार याने त्याचे साथीदारांसह खुन , खुनाचा प्रयत्न , खंडणी . दरोडा , जबरी चोरी , अपहरण बलात्कार , बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवणे , सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे , दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागील काळात केलेले असल्याने त्याचेवर सन २०१५ मध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती .

नमुद आरोपीस येरवडा कारागृहातुन जुलै २०१९ मध्ये बाहेर सुटले नंतर आपले अस्तित्व लपवुन राहु लागला होता . जेल बाहेर आल्यानंतर त्याने आपले सार्थीदारांना पुन्हा एकत्र करुन दोन खुनाच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे केले व पसार झाला . पोलीसांनी त्याचा कसोशीने शोध घेवुन त्यास लागलीच दाखल गुन्ह्यात अटक करुन पुन्हा ऑगस्ट २०१९ मध्ये येरवडा जेलमध्ये रवानगी केली . परंतु कोव्हीड १९ च्या प्रार्दभावाचा फायदा घेत आरोपी मा न्यायालयातुन जामीन घेवुन पुन्हा जानेवारी २०२० मध्ये येरवडा जेलमधुन बाहेर सुटला . आरोपी बंटी पवार याचा शोध घेत असताना मिळालेल्या माहीतीवरुन त्यास दि .२० / ०६ / २०२१ रोजी त्यास व त्याचा साथीदार शुभम बबन वाघमारे यांना कि रूपये ५,१०,४५० / – किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व रोख रक्कमेसह पकडले होते .

त्याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन , पुणे शहर गुन्हा रजि नं . २५५/२०२१ एन . डी . पी . एस . अॅक्ट कलम ( क ) . २० ( ब yii ) ( क ) , २९ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती . दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना मुख्य आरोपी बंटी पवार याचा गांजाचे व्यवसायामध्ये त्याचा आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले . त्याबाबत अधिक तपास करता त्याचा साथीदार प्रविण बाळासाहेब ढाकणे याचे कब्ज्यात कि रु २७,००० / – चा ०१ किलो २०० गांजा मिळुन आल्याने त्यास अटक करण्यात आली होती . आरोपीतांना मा न्यायालयात हजर करुन पोलीस करटडी घेवुन अधिक तपास करता यातील मुख्य आरोपी बंटी पवार याचे सांगणेवरुन सर्वांनी मिळुन एकत्र येवुन सदरचा गांजा विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याचे निष्पन्न झाले .

आरोपीतांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असताना ही आरोपीनी वरील गंभीर गुन्हे केल्याने आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) . ३ ( २ ) व ३ ( ४ ) या कलमाचा समावेश करुन मोका कायद्याअंतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव

श्री देवीदास घेवारे , वपोनि , सिंहगड रोड पो स्टे , यांनी मा पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ३ पुणे शहर यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी बंटी पवार याचे टोळीचे सदस्य म्हणुन काम करीत असुन त्यांनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केलेला आहे . आरोपीतांनी संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण करुन एकटवाने व संयुक्तिक रित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरीता व त्यातुन गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळविण्याकरीता गुन्हे केलेले आहेत . सदर संघटीत गुन्हेगारी टोळीने आपले टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याचे उद्देशाने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठेवले असल्याने दाखल गुन्हा रजि नं , २५५/२०२१ एन . डी . पी , एस , ॲक्ट कलम ८ ( क ) , २० ( ब ) ( ii ) ( क ) , २९ या मध्ये आरोपी नामे

१ ) महेश ऊर्फ बंटी प्रकाश पवार , वय ३६ वर्षे , धंदा काही नाही , रा समर्थनगर , वडगाव बु पुणे

२ ) शुभम बबन वाघमारे , वय २६ वर्षे , रा तुकाईनगर समाज मंदीरामागे , तुकाईनगर , वडगाव बु पुणे

३ ) प्रविण बाळासाहेब ढाकणे , वय १९ वर्षे , रा जाधव यांचे बंगल्याशेजारी , साई मंदीराजवळ जाधवनगर , वडगाव बु पुणे

यांचेविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमांचा समावेश करण्याबाबत मा श्री डॉ संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांनी मंजुरी दिल्याने आरोपीविरुध्द मोका कायद्याअंतर्गत पुढील कारवाई केलेली आहे . पुढील तपास श्री गजानन टोपे , सहाय्यक पोलीस आयुक्त , कोथरुड विभाग हे करीत आहेत . सदरची उल्लेखनीय कामगिरी मा पोलीस आयुक्त , श्री अमिताभ गुप्ता , पुणे शहर . मा.पोलीस सह आयुक्त , डॉ रविंद्र शिसवे , मा अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , डॉ संजय शिंदे , मा पोलीस उप आयुक्त , परीमंडळ ३ पुणे शहर श्रीमती पौर्णिमा गायकवाड , मा सहाय्यक पोलीस आयुक्त , सिंहगड रोड विभाग , पुणे शहर श्रीमती पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली मा देवीदास धेवारे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगडरोड पो स्टे , मा . प्रमोद वाघमारे , पोलीस निरीक्षक गुन्हे सिंहगड रोड पो स्टे , सपोनि चेतन थोरबोले , पोतपनि कुलदीप संकपाळ , पोलीस कर्मचारी प्रमोद कळमकर , मोहन भुरुक , आबा उत्तेकर , राजेश गोसावी , शंकर कुमार , उज्वल मोकाशी , सचिन माळवे , दयानंद तेलंगेपाटील , पुरुषोत्तम गुन्ला , योगेश झेंडे , धनाजी धोने , अविनाश कोंडे , राहुल शेडगे , किशोर शिंदे , रफिक नदाफ , सागर भोसले , गिरीष एकोगे , शैलेष चव्हाण यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मा पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून असुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत . त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही ३९ वी कारवाई आहे ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *