सराईत गुन्हेगार उमेश वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का अंतर्गत कारवाई : खडक पोलीस स्टेशन मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०२/०२/२०२३ .खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर मकोका अंतर्गत केलेली ही ०९ वी कारवाई आहे.

खंडणी व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व दहशत माजविणा-या, उमेश मुकेश वाघमारे व त्याचे इतर ०५ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई.

खडक पोलीस हद्दीत नातुबाग, शिंदे आळी, शुक्रवार पेठ येथे खंडणी उकळण्यासाठी एकावर प्राणघातक हल्ला चढवून कोयते हवेत फिरवून दहशत पसरविणाऱ्या वाघमारे टोळी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे उमेश मुकेश वाघमारे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ६ साथीदार यांनी खडक पोलीस स्टेशन हद्दीत दि. २४/११/२०२२ रोजी नातुबाग, शिंदे आळी, शुक्रवार पेठ, पुणे येथे फिर्यादी यांचेकडे खंडणीची मागणी केली होती. परंतु फिर्यादी यांनी त्यांस पैसे देण्यास नकार दिल्याचे कारणावरून फिर्यादी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून हातातील हत्यारे उंचावुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्याबाबत खडक पोलीस स्टेशन ३४१ / २०२२ भा.द.वि. कलम ३०७, ३८७ ३४५ १४३, १४४, १४७, . १४८, १४९, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास दरम्यान आरोपी १) उमेश मुकेश वाघमारे, वय २४ वर्षे (टोळी प्रमुख) २) मंदार संजय खंडागळे, वय २१ वर्षे ३) आदित्य लक्ष्मण बनसोडे ऊर्फ भुंडया, वय १९ वर्षे ४) गणेश मारुती शिकदार, वय १९ वर्षे ५) विनायक ऊर्फ नंदु सुनिल शिंदे वय २२ वर्ष व एक पाहिजे आरोपी आ.क्र.१ ते ५ यांना अटक करून, त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांनी अवैद्य मार्गाने अर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदेशिर घातक शस्त्रे जवळ बाळगणे या गुन्ह्याद्वारे सर्व सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाते गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२) ३ (४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, पुणे, श्रीमती संगीता यादव यांनी मा. पोलीस उप- आयुक्त, परि १, पुणे, संदीप सिंह गिल यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांना सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी यांना खडक पोलीस स्टेशन ३४१ / २०२२ भा.द.वि. कलम ३०७,३८७,३४१,१४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०६ आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii),३(२), ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेंद्र डहाळे पुणे शहर यांनी मान्यता दिली आहे

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर श्री. सतिश गोवेकर हे करीत आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप , अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पुणे, पोलीस उप-आयुक्त, परि-१, पुणे संदीप सिंह गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, पुणे, श्रीमती संगीता , पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस उप-निरीक्षक अतुल बनकर व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करून संघटीत गुन्हेगारी करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. आजपर्यंत त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ०९ वी कारवाई आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *