जातीचे दाखले देण्यासाठी ४ हजार रुपये लाच घेताना ऑपरेटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरणाच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. पुणे लाचलुचपत पथकाने ही कारवाई गुरुवारी निगडी येथील नागरी सुविधा केंद्रात केली.

.

जातीचे प्रमाणपत्र लवकर काढून देण्यासाठी ४ हजार रुपये लाच घेताना पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरणाच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.) निगडी येथील नागरी सुविधा केंद्रात केली.

शैलेश अकांबरी बासुटकर (वय-४१) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या दोन लहान बहिणींचे जातीचे दाखले लवकर देण्यासाठी शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांन लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि गुरुवारी (दि.2) पडताळणी केली असता शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने नागरी सुविधा केंद्रात सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून लाच घेताना शैलेश बासुटकर याला रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे,
पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर
महिला पोलीस हवालदार पौर्णिमा साका, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माने, चालक ASI जाधव यांच्या पथकाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 982233156

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *