युनिट २ गुन्हे शाख ची कामगिरी फरार असलेल्या आरोपीला केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक ०८/०४/२०२२ युनिट २ गुन्हे शाख पुणे शहर .

एका वर्षानंतर घरफोडी चोरीतील अट्टलचोर जेरबंद पाच लाख तीनशे रुपये किंमतीचे १०२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने जप्त तीन गुन्हे उघड.

दिनांक १०/०३/२०२१ रोजी दुपारी ०३/३० ते दिनांक १५/०३/२०२१ रोजी सकाळी ०७/२५ वा चे दरम्यान श्री.प्रदीप स्वामी रा.कात्रज पुणे यांचे आणि त्यांचे शेजारील ओम सोसायटी मध्ये राहणारे • सतीश करंदीकर यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन दोन्ही घरातील दोन लाख नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्या व चांदीचे दागिने चोरुन नेले होते त्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे गुरनं १५८/२०२१ भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे .

युनिट २ गुन्हे शाखा पुणे पोलीस निरीक्षक श्री.क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली • पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस अभिलेखावरील घरफोडी चो – या करणारे गुन्हेगार चेक करत असताना खबऱ्याकडुन माहीती मिळाली की सुमारे एका वर्षांपूर्वी झालेली वरील घरफोडी चोरीचा गुन्हा पोलीस अभिलेखा वरील सराईत गुन्हेगार जयवंत उर्फे जयड्या गोवर्धन गायकवाड , वय – ३४ वर्ष रा . आंबेडकर वसाहत डी.पी. रोड औंध पुणे यानेच केलेला आहे.

अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती . त्या अनुषंगाने पोलीस त्याचा शोध घेत असताना तो सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर पोलीसांनी सदर आरोपीस मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट नंबर ४ शिवाजी नगर , पुणे यांचे आदेशावरुन त्यास मध्यवर्ती कारागृह , येरवडा , पुणे येथुन ताब्यात घेतले आहे . व त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे बारकाईने तपास केला प्रथम त्याने माहीती देण्यास टाळाटाळ केली सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याने पुणे शहरात व भुगाव भागात घरफोडी चो – या केल्याची व त्यामधील सोन्याचे व चांदीचे दागिने वेगवेगळ्या ठिकाणी गहाण ठेवल्याची माहीती पोलीसांना दिली आहे . त्याप्रमाणे पोलीसांनी पुणे शहर , देहु रोड , श्रीरामपुर जिल्हा अहमदनगर , सोलापुर या भागात त्याचेसह जावुन तपास केला आहे . त्याचेकडुन वरील गुन्हयातील चोरीच्या दागिण्यासह इतर गुन्हयातील • सोन्याचे दागिने वजन १०२ ग्रॅम किंमत रुपये पाच लाख पाच हजार सातशे चे जप्त करण्यात आलेले आहे . त्याचेकडुन भारती विद्यापिठ पोलीस स्टेशन , सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर व पौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण कडील प्रत्येकी एक असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहे.

सदर आरोपी हा पोलीस अभिलेखावरील घरफोडी चोरी करणारा सराईत व अट्टल गुन्हेगार आहे त्याचेविरुध्द यापुर्वी पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड आयुक्तालयचे अभिलेखावर १०४ पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .मा.न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठी दिली आहे .

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त ,डॉ.रविंद्र शिसवे,मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा , पुणे शहर , श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त , गुन्हे शाखा , पुणे शहर ,श्री.श्रीनिवास घाडगे,मा.सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ पुणे शहर ,श्री.गजानन टोणपे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा युनिट २. पुणे शहर , पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड , सहायक पोलीस फौजदार यशवंत आंब्रे , अस्लम पठाण , पोलीस अंमलदार गजानन सोनुने कादीर शेख , समीर पटेल , नागनाथ राख , संजय जाधव , निखील जाधव , साधना ताम्हाणे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *