दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी पेट्रोलिंग करत असताना आरोपीला केली अटक.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ यांनी ०४ दुचाकी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
पुणे शहरामध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढत असल्याने मा.पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे व सहा.पो.आयुक्त श्री नारायण शिरगावकर यांनी रेकॉर्डवरील वाहनचोरांवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वाहनचोरी व दरोडा विरोधी पथक- २ कडील अधिकारी व स्टाफ हे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दि.६/०४/२०२२ रोजी पोलिस अंमलदार अमोल सरतापे आणि मनोज खरपुडे यांना त्यांचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, साई बाबा मंदिराजवळ, विजू गव्हाणे चौक, शिवनेरीनगर,कोंढवा, येथे एक इसम चोरीची दुचाकी विकण्यासाठी थांबले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी सदर परिसरात जाऊन सापळा लावला असता एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव जावेद सैपन अत्तार, रा भारत कॉलनी, हांडेवाडी, हडपसर असे सांगितले असून यास चोरीच्या वाहनासह ताब्यात घेऊन त्याच्या कडे चौकशी करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत .
१)हडपसर पो.स्टे.गुरनं ३५०/ २०२२ भादवि कलम ३७९
२) कोंढवा पोस्टे गुरनं ११३७/ २०२१भादवि कलम ३७९
३) लोणीकंद पोस्टे गुरनं ८१/ २०२२भादवि कलम ३७९
४) हडपसर पोस्टे गुरनं २९९/ २०२१भादवि कलम ३७९
असा एकूण ५९,०००-/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगावकर सो , यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विवेक पाडवी,पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश लोखंडे, दिनकर लोखंडे, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, मुकुंद पवार, अमोल सरतापे यांचे पथकाने केली आहे.
सुनिल पंधरकर. पोलीस निरीक्षक,
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर.
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६