फॅशन स्ट्रीट परिसरात व्यापा – यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -१५/०६/२०२२ युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर .

फॅशन स्ट्रीट परिसरात व्यापा – यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका आरोपीस अटक .

दिनांक १४/०६/२०२२ रोजी सायंकाळी २०/०० वा . चे सुमारास लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत फॅशन स्ट्रीट जवळ ए . बी . सी . फार्म दुकाना समोर कॅम्प पुणे येथे एका व्यापा – यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचेवर गोळीबार झाला होता .

या घटनेत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना ससुन हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . त्याबाबत यातील जखमी यांनी दिलेल्या फिर्यादी प्रमाणे लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५७/२०२२ भादविक ३०७,३४ , आर्म अॅक्ट क ३ ( २५ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे . दाखल गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने त्याबाबत समांतर तपास करण्याचे वरिष्ठांकडुन

आदेश प्राप्त झालेने युनिट -२ प्रभारी वपोनि मा क्रांतीकुमार पाटील साो . यांनी तात्काळ गुन्हयाचे समांतर तपासकामी तात्काळ २ टीम तयार करुन योग्य सुचना व मार्गदर्शन करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन तात्काळ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आज दि .१५/०६/२०२२ रोजी युनिट -२ कडील सपोनि विशाल मोहिते , पोउपनि राजेंद्र पाटोळे व युनिट -२ कडील पोलीस अंमलदार असे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना यांना त्यांचे बातमीदारा कडुन मिळालेल्या बातमी वरुन गुन्हयातील

आरोपी नामे नईम ऊर्फ शानु सलीम शेख वय -३८ वर्षे धंदा- व्यवसाय रा . भिमपुरा गल्ली नं १५ घरनं १५२३ कॅम्प पुणे यास लुल्लानगर ब्रिज खाली शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले . •

लष्कर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्हयातील फिर्यादी मध्ये आरोपी नामे ( १ ) ज़ुल्फिकार बशीर कुरेशी ऊर्फ शेख वय ४३ रा . चुडामन तालीम , भवानी पेठ पुणे .

( २ ) तबरेज कुरेशी रा . कुरेशी मस्जिद जवळ कॅम्प , पुणे व ताब्यात घेतलेला

इसम नामे नईम ऊर्फ शानु सलीम शेख वय ३८ रा . भिमपुरा गल्ली नं १५ घरनं १५२३ कॅम्प पुणे.

यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही कामी लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे .तरी गंभीर गुन्हयातील आरोपीस गुन्हा दाखल झाले पासुन ७ तासात जेरबंद करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे .

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक ,मा.पोलीस उप आयुक्त ( आर्थिक व सायबर ), श्रीमती भागश्री नवटक्के , अतिरिक्त कार्यभार , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे सहा . पो . आयुक्त गुन्हे , श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , क्रांतीकुमार पाटील , गुन्हे शाखा , युनिट -२ , पुणे शहर , सपोनि विशाल मोहिते , पोउपनि राजेंद्र पाटोळे पो .अं .मोहसीन शेख , निखिल जाधव , उत्तम तारु शंकर नेवसे , विनोद चव्हाण , प्रमोद कोकणे , साधना ताम्हाणे , समीर पटेल या पथकाने केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *