पेट्रोलींग करीत असतांना सासवड पोलिसांची कामगिरी मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मोटार सायकल चोरी करणाऱ्या सांगली जिल्हयातील सराईत चोरटयास अटक व चोरलेली मोटार सायकल जप्त.

सासवड पोलीस स्टेशन हद्दीत दि.10/06/2022 रोजी दुपारी 13.00 वा चे सुमारास फिर्यादी रमेश मुरलीधर ठोंबरे, वय.67 वर्ष, धंदा.सलुन व्यवसाय, रा.सासवड, संत नामदेव षाळेच्या पाठिमागे, वाढीव हदद, ता.पुरंदर, जि.पुणे. यांची एक काळे रंगाची लाल, निळा पटटा असलेली हिरो होंन्डा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल गाडी नं. MH 12 ER 2012 ही ते दुपारी घरात झोपलेले असतांना घराबाहेर हॅंन्डल लाॅक करून उभी केलेली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरूने नेले बाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गु.रजी. नं. 249/2022 भा.दं.वि.का.क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल असुन तपास पोलीस नाईक दत्ता जाधव यांचेकडे आहे.

गुन्हयाचा तपास चालु असतांना पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद हे काल दि.14/06/2022 रोजी सासवड ते जेजुरी असे पेट्रोलींग करीत असतांना खळद गावचे हददीत रोडवर त्यांना एक इसम मोटार सायकलवर जेजुरीकडे जात असतांना दिसला त्याला थांबवुन विचारपुस केली असता

त्याने त्याचे नाव सौरभ राजेंद्र ईंगळे, वय. 22 वर्शे, रा. पंढरपुर रोड, मेंढे मळा, मिरज, ता.मिरज, जि.सांगली असे सांगितले तसेच त्याचेकडे असलेली हिरो होंन्डा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मी रेल्वेने पुणे येथे आलो होतो. पुणे येथुन बसने सासवड येथे आलो पुढे जायला पैसे संपले म्हणुन दि.10/06/2022 रोजी सासवड येथुन ही चोरलेली मोटार सायकल चोरल्याचे सांगितले.

तसेच मी यापुर्वी सांगली जिल्हयात बऱ्याच मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत व पेट्रोल संपले की तेथेच सोडुन जातो सांगितले. त्याला गाडीसह ताब्यात घेवुन सासवड पोलीस स्टेषनला आणुन गाडीचे मालकाचा शोध घेतला असता सदरची गाडी चोरी बाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

आरोपी सौरभ राजेंद्र ईंगळे, वय. 22 वर्शे, रा. पंढरपुर रोड, मेंढे मळा, मिरज, ता.मिरज, जि.सांगली यांचेकडुन गुन्हयातील चोरलेली काळे रंगाची लाल, निळा पटटा असलेली हिरो होंन्डा स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल गाडी नं. MH 12 ER 2012 ही कि.रू. 30,000/- ची गुन्हयात जप्त करण्यात आलेली आहे.

आरोपी हा सांगली जिल्हयातील सराईत गुन्हेगार असुन विशेष म्हणजे तोे अल्पवयीन असले पासुन मोटार सायकल चोरी करतो. त्याचेवर आजपर्यंत मोटार सायकल चोरीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून अटक आहे.

1)सांगली शहर पो.स्टे. सांगली गु.रजी.नं. 161/2017 भा.दं.वि.का.क. 379

2)कामटी पो.स्टे. सोलापुर गु.रजी.नं. 192/2021 भा.दं.वि.का.क. 379,511, आर्म अॅक्ट क.4,25

3)मिरज शहर पो.स्टे. सांगली गु.रजी.नं. 229/2021 मुं.पो.का.क. 122

4)महात्मा गांधी पो.स्टे. सांगली सन/2017 भा.दं.वि.का.क. 379 प्रमाणे 3 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक सो, बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आण्णासाहेब घोलप, पोलीस उप.निरीक्षक विनय झिंजुर्के, सहा.पोलीस उप.निरीक्षक दत्तात्रय माने, पोलीस नाईक गणेश पोटे, जब्बार सय्यद यांचे पथकाने केलेली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *