Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

दहा हजारांची लाच घेताना पुणे ग्रामीण येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर अँटी करप्शन ची कारवाई,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथील सहायक पोलीस उपनिरीक्षकावर लाच स्विकारले प्रकरणी कारवाई.

पुणे : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान,

शिरूर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात यातील तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध माहे एप्रिल / २०२१ मध्ये शिरुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२१/२०२१, भा.दं. वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास लोकसेवक सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गवारे हे करीत होते.गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक पोलीस फौजदाराला रंगेहात पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर तहसीलदार कचेरीसमोर असलेल्या हॉटेल मित्रधनमध्ये ही कारवाई करण्यात आली.राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे अटक करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी तसेच  गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजेंद्र दगडू गवारे याने ५० हजारांची लाच मागितली. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली.या तक्रारीचे अनुषंगाने मंगळवारी पडताळणी करण्यात आली. राजेंद्र दगडू गवारे याने तडजोड़ीअंती १०.००० दहा हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच पंचासमक्ष स्वीकारताना राजेंद्र दगडू गवारे याला रंगेहाथ पकडले.

सदरची कारवाई मा.पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे, आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली….

लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *