औषधांच्या नावाखाली मद्याची चोरटी वाहतुक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उघडकीस आणण्यात आली आहे, ९३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दिनांक: १९/१२/२०२३, (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान
मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. डॉ. विजय सुर्यवंशी सो, मा. संचालक (अं.व.द) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री. सुनिल चव्हाण सो यांच्या आदेशान्वये व मा. विभागीय उप आयुक्त श्री. विजय चिंचाळकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग,
औषधांच्या नावाखाली महाराष्ट्रात होणारी गोवा निर्मीत विदेशी मद्याची चोरटी वाहतुक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उघडकीस आणण्यात आली आहे. या मद्याची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादनच्या पथकाने पकडला असून ८२ लाख ८ हजारांचे मद्य, ११ लाख ५० हजारांचा ट्रक असा एकूण ९३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सदर वाहनास बाजूला घेवून वाहनातील ड्रायव्हरकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता, वाहन चालकाने वाहनामध्ये औषधे आहेत असे सांगून त्याबाबतची औषधांची बील टीपी, टॅक्स इन्व्हाईस व ई वे बिल अशी कागदपत्रे दाखविली. परंतु खात्रीलायक बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार सदर वाहनाचा क्रमांक, बातमीची खातरजमा करणेकरीता सदर कंन्टेनरचे कुलूप उघडून पाहिले असता कंन्टेनरमध्ये एकुण ९५० बॉक्स मध्ये मद्याने भरलेल्या रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या मद्याच्या ब्रॅण्डच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण ४५६०० सिलबंद बाटल्यांचा साठा मिळून आला.
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चालकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी २१ डिसेंबर पर्यंत ०२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विपुल देविलाल नट (वय ३२, रा. देविलालजी नट व्हिलेज, बांसवाडा, राजस्थान) असे अटक चालकाचे नाव आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाकडून बेकायदा मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेषता: गोवा निर्मीत अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाईच्या करण्याच्या सूचना संचालक डॉ. विजय सुर्यवंशी, सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त विजय चिंचाळकर दिल्या आहेत. त्यानुसार, भरारी पथक गस्तीवर होते. सोमवारी गस्तीवर असतानाच गोवा निर्मीत विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी गोव्यामधून बेंगलोर – मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन विक्रीसाठी एक ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, पथकाने खेड शिवापूर टोल नाक्यावर सापळा लावला. याठिकाणी मंगळवारी पहाटे चाकी टॅम्पो क्र. GJ 23/ AW 1921 हा ट्रक आलेला दिसला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला.चालकाकडे चौकशी केली असता त्याने गाडीत औषधे असल्याचे सांगितले. औषधांची बीले, टॅक्स इन्व्हाईस व ई वे बिल अशी कागदपत्रे दाखविली. परंतु, खातरजमा करण्याकरीता ट्रकमधील कंटेनरचे कुलुप उघडून पाहिले असता मद्याने भरलेले ९५० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या मद्याच्या ब्रॅण्डच्या १८० मिली लीटर क्षमतेच्या एकुण ४५ हजार ६०० सिलबंद बाटल्यांचा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागला. या बाटल्यांवरील लेबलांची पाहणी केली असता त्यावर ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ व उत्पादक कंपनीचे नाव ‘पिगॉट चॅपमॅन अॅण्ड कंपनी’, कोलवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, बारदेस, गोवा असे छापलेले दिसून आले.

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री. नंदकुमार शा. जाधव, दुय्यम निरीक्षक श्री.ए.सी.फडतरे, तसेच जवान सर्वश्री. अमर कांबळे, अहमद शेख, एस. एस. पोंधे, अनिल थोरात, पी.टी. कदम भरत नेमाडे व जवान नि वाहनचालक श्री. अमोल दळवी यांनी सहभाग घेतला असून गुन्हयाचा पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे दु. निरीक्षक श्री. ए. बी. पाटील हे करीत आहे.
(नंदकुमार शा. जाधव) निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in