अनाधिकृत सावकाराच्या खंडणी विरोधी पथक-१ ने केले जेरबंद.१५% टक्के व्याजाने पैसे देणा-या सावकारांवर कारवाई .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक ०९/०३/२०२३ ऑनलाईन पुणे :-(ACS NEWS)
अनाधिकृत सावकाराच्या खंडणी विरोधी पथक-१ ने केले जेरबंद.१५% टक्के व्याजाने पैसे देणा-या सावकारांवर कारवाई .
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुणे शहरात चालू असलेल्या बेकायदेशीर सावकारीवर आळा बसण्यासाठी जादा व्याजाने पैसे देणा-या सावकारांवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडुन प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक – १ गुहे शाखा यांच्याकडे धानोरी येथील सावकारा विरूद्ध १५% व्याज दराने घेतलेले पैसे परत करून ही त्याला व त्याच्या कुटुंबास शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देवून अर्जदार यांची दुचाकी ठेवून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.
प्राप्त तक्रारी अर्ज चौकशीमध्ये अर्जदार यांनी तीस हजार रुपये १५% व्याजाने घेतले असता त्या बदल्यात गैर अर्जदार यांना (४०) चाळीस हजार रुपये रोख दिलेले होते तरी गैरजदार यांनी अर्जदार यांची मोटरसायकल व गाडीचे पेपर सिक्युरिटीपोटी स्वतःकडे ठेवून अजून पैशाची मागणी करत करीत होता व पैसे मागणी करीत असताना अर्जदार व त्यांचे आई-वडील यांना रात्री घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी असल्याचे निष्पन्न झाल्याने गैर अर्जदार अक्षय विजय आल्हाट वय 25 वर्ष, रा. लेन न 3, सिध्दार्थ नगर, धानोरी, पुणे याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पो स्टे येथे गुन्हा रजिस्टर नंबर- 74/2023 भा द वि 387, 504, 506, व महा. सावकारी अधिनियम 39, 45 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे – १, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, खंडणी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे, पो.उप निरी. विकास जाधव, पोलीस अंमलदार, अमोल आवाड, अमर पवार, प्रमोद सोनावणे, मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव व संभाजी गंगावणे यांनी केली आहे..
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad