लोणीकंद सायबर तपास पथकाची कामगिरी विविध तक्रारदार यांचे हरवलेले परत केले २१ मोबाईल फोन.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
लोणीकंद पोलीस ठाणे पुणे शहर .
ऑनलाईन पुणे :-दिनांक ०९/०३/२०२३ (ACS NEWS)
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६.
फिर्यादी यांचे हरवलेले २१ विविध कंपन्याचे मोबाईलचा शोध घेवुन ते फोन हस्तगत करून फिर्यादी यांना पुनः प्रदान केले.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल हरवले बाबत तक्रारी नोंद केलेल्या होत्या, सदर तक्रारींची दखल घेऊन हरवलेले मोबाईल फोन याचा शोध घेऊन ते हस्तगत करणेबाबतचे आदेश मा वपोनि गजानन पवार सो यांनी लोणीकंद सायबर तपास पथकास दिलेले होते त्यावरून लोणीकंद सायबर तपास पथकाने हरवलेले मोबाईलबाबत अधिकची माहीती प्राप्त करुन तसेच तांत्रिक विश्लेषण करून विविध भागातुन एकुण २१ अॅप्पल, सॅमसंग, वन प्लस, व्हियो, ओप्पो, रिअल मी एम आय असे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन हस्तगत केले व ते तक्रारदार यांना मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०४ शशिकांत बोराटे सो यांचे हस्ते सुपूर्त केले. तक्रारदारांनी लोणीकंद सायबर तपास पथक यांचे आभार मानले..
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मा. श्री. रंजनकुमार शर्मा सो मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ -०४ श्री. शशिकांत बोराटे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री किशोर जाधव सो, लोणीकंद पोलीस स्टेशन मा. वपोनि श्री गजानन पवार सो, पोनि गुन्हे श्री मारुती पाटील सो यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोस्टे सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक सुरज किरण गोरे, पोलीस अमलदार समीर पिलाणे, सागर पाटील, महिला पोलीस अंमलदार किर्ती नरवडे, कोमल भोसले, वृंदावनी चव्हाण यांनी केलेली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad