बनावट ओळखपत्र , आधारकार्ड व पॅनकार्ड बनविणाऱ्या सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथकाने केली अटक .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक २६/०५/२०२२ – खंडणी विरोधी पथक-१,गुन्हे शाखा ,
पुणे शहर व बनावट मतदान ओळखपत्र,आधारकार्ड व पॅनकार्ड बनविणा – या सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या
मिलीटरी इन्टीलीजन्स,लायझन युनिट,पुणे यांनी अवैध मार्गाने येणारे घुसखोर,समाजविघातक कृत्य करणा – या व्यक्ति तसेच लॅण्ड माफिया यांना हवालाद्वारे पैशाचे व्यवहार करणेकरीता बनावट डाक्युमेंट तयार करून देणारी टोळी कार्यरित असलेबाबत पत्र मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांना दिले . त्यानुसार मा.सह पोलीस आयुक्त सोो , पुणे शहर ,मा.अप्पर पोलीस आयुक्त सोो , गुन्हे , पुणे शहर ,मा.पोलीस उपायुक्त ( गुन्हे ) पुणे शहर यांनी सदरबाबत सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशित केले असता त्याबाबत
लागलीच अधिक सखोल चौकशी करून बनावट कागदपत्र तयार करून देणारा
आरोपी नामे कल्पेश रमेश बोहरा यास सापळा कारवाई करून ताब्यात घेतले.त्याअनुषंगाने बंडगार्डन पोलीस ठाणे , पुणे शहर गु.र.नं.११३/२०२२ भादंवि कलम ४१७, ४२०,४६५ , ४६६,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
असून आरोपी नामे कल्पेश रमेश बोहरा यास दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे .
दाखल गुन्हयामध्ये अटक आरोपी कल्पेश रमेश बोहरा याचेकडून बनावट मतदान ओळखपत्र , आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य त्यामध्ये लॅपटॉप , प्रिंन्टर , स्कॅनर , बनावट शिक्के बनविण्याची मशीन , आठ मोबाईल बनावट नावांनी घेतलेली सिमकार्ड व बनावटरित्या तयार केलेले मतदान ओळखपत्र , आधारकार्ड व पॅनकार्ड , डेबिट कार्ड , बँक पासबुक , बनावट कागदपत्रे व इतर साहित्य पंचनाम्याने जप्त करण्यात आले आहे .
दाखल गुन्हयामध्ये आतापर्यत इतर आरोपी नामे
२ ) उमेश जगन्नाथ बोडके ( प्रॉपर्टी एजंट ) वय – ४७ वर्षे व्यवसाय- लॅन्ड कन्सलन्टींग रा- सुखातूर निवास , दुसरा मजला , रूम नं १२, नारायणवाडी , शिवाजी चौक , कल्याण ( पश्चिम ) , ता – कल्याण ठाणे- ४२१३०१३ )
अमोल गोविंद ब्रम्हे ( प्रॉपर्टी एजंट ) वय – ५८ वर्षे धंदा -प्रॉपर्टी एजंट रा . मंगलमुर्ती कॉम्पलेक्स राजाराम पुलाजवळ , सिंहगडरोड पुणे.
४)सचिन दत्तात्रय जावळकर ( प्रॉपर्टी एजंट ) वय – ४१ वर्षे रा . इगल सोसायटी , फ्लॅट नंबर -३ , कोथरुड गावठाण , पुणे .
५ ) सय्यद तालीब हुसैन सय्यद जामिन हुसैन वय – ४३ वर्षे , धंदा कॉर्मन सर्व्हिस सेंटर चालक , रा . वॉर्ड नं . ३ , हरिफैल मस्जीद मागे , हरिफैल , खामगाव , बुलढाणा
६ ) प्रदिप अनंत रत्नाकर ( प्रॉपर्टी एजंट ) वय ५४ वर्षे रा . रुम नं . १६ , प्रभुकृपा अर्पाटमेंट , डॉ . मुजुमदार रोड , कात्रप , बदलापूर पुर्व , ठाणे
७ ) मोहम्मद आसिफ मोहम्मद युनुस वय ३८ वर्षे , धंदा – कॉर्मन सर्व्हिस सेंटर रा . टिळक मैदान , मेमन जमातखाना जवळ , खामगाव , बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे .
दाखल गुन्हयातील वर नमूद इतर अटक आरोपींकडून गुन्हयाचे अनुषंगाने महत्त्वपूर्ण पुरावा प्राप्त झाला असून तो दाखल गुन्हयामध्ये जप्त करण्यात आला आहे .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad