समर्थ पोलीस स्टेशनची पून्हा धडाकेबाज कामगिरी .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक २७/०५/२०२२ मोक्क्याच्या गुन्हयातील आंदेकर टोळीमधील फरार आरोपीला पाठलाग करून अटक : समर्थ पोलीस स्टेशनची पून्हा धडाकेबाज कामगिरी .
पुणे शहराच्या मध्यवस्ती मधील आंदेकर टोळीचा सदस्य तसेच मोक्क्याच्या गुन्हयात फरार असणाऱ्या आरोपीला समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सापळा रचून शिताफीने अटक केली आहे
सदर आरोपीचे नांव पत्ता तन्मय गणेश कांबळे वय १९ वर्षे ,
रा .८७७ , राजेवाडी नाना पेठ पुणे हा असे असून फरार काळात तो त्याचे मामाचे गांवी मु.पो. चास नारोडी , तालुका आंबेगाव , जिल्हा पुणे येथे रहात होता . सदर आरोपी त्याचे आई वडीलांना भेटण्यासाठी आला होता . दोन महिन्यापूर्वी आरोपी तन्मय कांबळे व त्याच्या साथीदारांनी काळेपडळ , हडपसर परीसरातील एका दांपत्याला दमदाटी करून , आंदेकर टोळीचा धाक दाखवून मला उसने पैसे दिलेले मागता का , तुम्हाला माहित नाही का , आम्ही ए गँगचे आहोत , आमच्या पुढे आवाज नाही करायचा नाहीतर खेळ खल्लास असी दमबाजी करून तुफान गोंधळ करून राडा केला होता व दहशत माजवून जिवे ठार भारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता .
सदर बाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि . नं . ३०१/२०२२ भा.द.वि.कलम ३०७,३२३ , १४३ , १४७,१४८ , १४९ , ५०६,५०४ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) , मपोकाक ३७ ( १ ) सह १३५ , क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट ३ व ७ मोकाक ३ ( १ ) ( ii ) .३ ( २ ) .३ ( ४ ) अन्वये गुन्हा दाखल होता .
दि . २६/०५/२०२२ रोजी समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीत तपास पथकातील पोलीस अंमलदार मा . राष्ट्रपती भारत सरकार यांचे पुणे भेटीचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की , नमुद मोक्क्यामधील गुन्हयात तन्मय गणेश कांबळे यास दाखल गुन्हयात मोक्का लागला असुन दाखल गुन्हयातील त्याचा जामीन रद्द झाला आहे . त्यास मोक्का अंर्तगत कारवाई करिता अटक करणे गरजेचे असल्याची माहिती मिळाली होती .
सदरची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करणेचे आदेश दिले . समर्थ पोलीस स्टेशनकडील सहा.पोलीस निरीक्षक श्री संदीप जोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , शुभम देसाई , सुभाष मोरे , विठ्ठल चोरमले यांनी सदर आरोपी हा बारणे रोड , मंगळवार पेठ , पुणे येथे वजनकाटा ते गायकवाड हॉस्पीटल येथे येणार असलेने बातमी प्रमाणे सापळा रचून तो सार्वजनीक रोडच्या कडेला उभा असलेचे दिसले .
पोलीस अंमलदार यांची सदर आरोपी बाबत खात्री होताच त्यास पकडण्यासाठी जवळ गेलो असता त्यास आजूबाजूला पोलीस असल्याचा संशय आल्याने रोडवर असणाऱ्या वाहनांच्या गर्दीचा फायदा घेवून आरोपी त्याच्या दुचाकी वाहनावरून रॉग साईडने गाडी चालवत वेगात पळ काढत असतांना तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक श्री संदीप जोरे , पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , शुभम देसाई यांनी त्याचा जवळजवळ एक किलोमीटर धावत जावून पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले . सदरचा सिनेस्टाईल थरार रस्त्यावरून जाणारे नागरीक अवाक होवून पहात होते . त्यास ताब्यात घेतलेनंतर त्याचे नांव पत्ता विचारता त्याने आपले नांव पत्ता उपरोक्त नमुद प्रमाणे असलेचे सांगीतले . त्यास अधिक तपासकामी समर्थ पोलीस स्टेशन येथे घेवून आलो असून पुढील कायदेशीर कारवाई कामी हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे .
सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे , अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे शहर , श्री विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस हवालदार संतोष काळे , सुशील लोणकर , पोलीस नाईक सुभाष पिंगळे , पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , शुभम देसाई , सुभाष मोरे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , निलेश साबळे , शाम सुर्यवंशी यांनी केली आहे .
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad