पाच तासात दोन आरोपीला समर्थ पोलीस स्टेशन ने केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – २५/०५/२०२२ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर मध्यरात्री अज्ञात इसमाचा खुन : पाच तासातच आवळल्या दोन आरोपींच्या मुस्क्या

दि .२४/०५ /२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास जुनी जिल्हा परिषद समोरील फुटपाथवर एका अज्ञात तरुणाचा अंदाजे वय – ३५ वर्ष कोणत्या तरी धारदार तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन हत्या केलेची बातमी समर्थ पोलीस स्टेशनच्या अंमलदारांना मिळाली.सदर घटनेची माहीती मिळताच लागलीच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोहचले . घटनास्थळाची पाहणी केल्यावर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन समर्थ पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक , विष्णु ताम्हाणे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली .

घटनास्थळी मा.डॉ.प्रियंका नारनवरे ,पोलीस उप आयुक्त ,परिमंडळ – १ पुणे शहर ,मा.श्री.सतिश गोवेकर , सहा .पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे शहर यांनी भेट देवून तपासाबाबत व आरोपींचा शोध घेणेबाबत मार्गदर्शन केले . तपास पथकातील सपोनि संदीप जोरे स्वतः व तपास पथकातील टीमने विनाविलंब तपासाला सुरूवात केली . आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून पाहिले असता दोन संशयित इसम हे घटनास्थळापासून पुणे स्टेशन रोडने जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळुन आले . त्यांचा चेहरा , पोशाख व चालण्यावरून लागलीच संपुर्ण तपास पथकातील टीमने पुणे स्टेशन व आजुबाजूच्या परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली . आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील स्टाफला त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फतीने एका इसमास त्याच्या चेह – यावरून व पोशाखा वरून संशयित म्हणून ससून हॉस्पिटल येथून ताब्यात घेतले . त्यास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव

प्रभातकुमार कमलाकर मस्के , वय – ३७ वर्ष , रा . ससून हॉस्पिटल आवार , पुणे

असे सांगितले . तसेच दुस – या इसमास तपास पथकातील दुस – या टिमने त्यांच्या बातमीदारा मार्फतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून त्याच्या चेहरा , पोशाख व चालण्यावरुन संशयित म्हणून ताब्यात घेतले . त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव

निलेश बाळासाहेब भोसले , वय – २४ वर्ष , मु . पो . विंजर , तालुका वेल्हा , जि . पुणे

असे सांगितले . सदर वेळी दोन्ही संशयित इसमांना घडले गुन्हयाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली . त्यामुळे त्यांना स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले . त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता , सदरचा खुन हा त्यांनी दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली . मयत इसम व आरोपी यांची दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले होते , त्याचा राग मनात धरून आरोपींनी अज्ञात इसमाचा धारदार शस्त्राने खून केला आहे . सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं .८१ / २०२२ भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ,

सदर गुन्हयाचा तपास सपोनि.हेमचंद्र खोपडे हे करित आहेत .

सदरची कामगिरी ही मा .राजेंद्र डहाळे , अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा .डॉ.प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ- १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुंक्त , फरासखाना विभाग , पुणे शहर , श्री विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे , उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहा . पोलीस निरीक्षक , हेमचंद्र खोपडे , तपास पथकातील सहा .. पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , पोलीस उप निरीक्षक , सुनिल रणदिवे , पोलीस हवालदार संतोष काळे , सुशील लोणकर , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , महेश जाधव , शुभम देसाई , विठ्ठल चोरमले , निलेश साबळे , सुभाष मोरे , शाम सुर्यवंशी , सचिन पवार , समिर आवळे यांनी केली आहे ..

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *