चार दिवसांपूर्वी अपघात करून व वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांना आरोपी ला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा , पुणे शहर .

चार दिवसांपूर्वी अपघात करून व वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांना आरोपी ला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ने केली अटक.

दुचाकी व चारचाकी वाहनांची जबरी चोरी करुन पळुन जाताना फेटल अपघात करणारा आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक पोलीसांचे जाळ्यात .

मा.श्री अमिताभ गुप्ता सर यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी , जबरी चोरी , दरोडा सारख्या गुन्हयांना आळा घालुन घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते .

दि .२८/०७/२०२२ रोजी पुणे शहर पुर्व विभागात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ चे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीस आळा घालणे तसेच वाहन चोरीचे गुन्हेगारांवरती परीणामकारक कारवाईकामी वानवडी पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव यांना त्यांचे बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी प्रमाणे आरोपी नामे

१ ) रोहित रामप्रताप वर्मा , वय २२ वर्षे , रा . गल्ली नं . ३ , गणेश नगर , वानवडी , पुणे

२ ) विधीसंघर्षग्रस्त बालक नामे गौरव नितीन साठे , वय १६ वर्षे , रा . रुबी हॉल हॉस्पीटलचे मागे , आझादनगर , वानवडी , पुणे

यांना हडपसर , पुणे येथुन टि.व्ही.एस. स्कुटी पेप गाडी नं . एम . एच . १२ / बी झेड . / ९९३६ हिचे सह ताब्यात घेण्यात आले होते . सदर आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचे ताब्यात मिळुन आलेल्या टि.व्ही.एस. स्कुटी पेप गाड़ी हिचेबाबत अधिक चौकशी करता सदरची गाडी ही त्या दोघांनी मिळुन साळुंखे विहार रोडवरील जश्न हॉटेलच्या समोर स्कुटी चालकास लिफ्ट मागण्याचा बहाणा करून , त्यास हाताने मारहाण करून त्याचेकडील स्कुटी घेवून पळून गेले . त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या सदर टि.व्ही . एस . स्कुटी पेम गाडीबाबत माहीती घेता कोंढवा पोलीस स्टेशन , प्रमाणे गुन्हा नोंद आहे .

आरोपी नामे रोहित रामप्रताप वर्मा , वय २२ वर्षे , रा . गल्ली नं . ३. गणेश नगर , वानवडी , पुणे यास अधिक विश्वासात घेवुन , त्याचेकडे अधिक चौकशी तपास करता त्याने सांगितले की , सुमारे ४ दिवसांपूर्वी अंदाजे पहाटे ०४.३० वा . चे सुमारास त्याने व त्याचा वरील साथीदार असे दोघांनी खराडी बायपासचे पुढे नगर रोडवरील दर्गा येथे थांबलेली एक टाटा सुमो गाडीमधील चालक झोपलेला होता . त्या चालकास उठवुन दमदाटी करून , त्यास गाडीतून खाली उतरवून त्याची सुमो गाडी घेवुन निघुन गेले होते . त्यावेळी विधी संघर्षग्रस्त बालक नामे गौरव साठे हा सुमो चालवित होता व वरील आरोपी त्याचे शेजारी बसला होता . ते सुमो गाडी घेवुन गणेशनगर , वानवडी , पुणे येथे जात असताना खिंडीतून हेवन पार्कचे ठिकाणी आले असता , त्यांची गाडी वेगात असल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक गौरव साठेचा गाडीवरील ताबा सुटुन गाडी रस्तावरून डावे बाजुस वेगात जाताना रस्त्याचे कडेने पायी चालत जाणा – या एका इसमास जोरात धडक देवुन गाडी रस्त्याचे बाजुला असलेल्या खड्यात पडली . व धडक बसलेला इसम मयत झाल्याचे पाहुन ते दोघे गाडी सोडुन पळुन गेले होते . वगैरे असे आरोपी रोहित वर्मा याने सांगितल्याने वरील दोन्ही प्रकाराबाबत विमानतळ पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशन येथे खात्री केली असता , सदर बाबत अनुक्रमे विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा व वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा मोटर वाहन कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल आहे . आरोपी नामे रोहित रामप्रताप वर्मा हा रेकॉर्डवरील वाहनचोर असल्याने त्यास आणखीन विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता ,

त्याने हिंजवडी , चंदननगर , हडपसर व यवत भागातुन ४ दुचाकी वाहने चोरी केली होती ती दोन हौड़ा अॅक्टीवा गाडी , एक हिरो स्प्लेंडर प्लस गाड़ी व एक सी.डी. डिलक्स अशी ०४ दुचाकी वाहने पंचनाम्याने काढून दिल्याने ( किं . रु .१,२५,००० / – ) ची वाहने जप्त करण्यात आलेली आहे . सदर आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडुन पुणे शहरातील खालील प्रमाणे जबरी चोरी , वाहन चोरी व प्राणांतिक अपघात असे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत .

१) कोढवा पोलीस स्टेशन , पुणे येथे गुन्हा )विमानतळ पोलीस स्टेशन गुन्हा बानवडी पोलीस स्टेशन गुन्हा हडपसर पोलीस स्टेशन , चंदननगर पोलीस स्टेशन हिंजवडी पोलीस स्टेशन यवत पोलीस स्टेशन ,

सदरची कारवाई ही मा . पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता सर मा सह पोलीस आयुक्त डॉ . श्री संदीप कर्णिक सर , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री रामनाथ पोकळे , सर मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे श्री श्रीनिवास घाडगे सर , मा . सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री . नारायण शिरगांवकर सर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पंधरकर , सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी , व पोलीस अंमलदार राजेश अभंगे , दिनकर लोखंडे , राजेश लोखंडे , मनोज खरपुडे , शिवाजी जाधव , गणेश लोखंडे , सुदेश सपकाळ , राहुल इंगळे , संदीप येळे , विनायक येवले , विक्रांत सासवडकर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *