अट्टल मोबाइल चोरास Unit-२ ने केली अटक.

अट्टल मोबाइल चोरास Unit-२ ने केली अटक, चोरीतील ८७०००/- ₹ किमतीची ९ महागडे मोबाइल हस्तगत, २ गुन्हे उघडकीस आणण्यात यश.

आज दि. २६/०७/२२ रोजी Unit-२ कडील PSI राजेंद्र पाटोळे व स्टाफ असे Unit-२ हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना HC/मोहसीन शेख याना गुप्त बातमीदारामार्फत एक इसम संजय गांधी मार्ग, पुणे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरीतील मोबाइल स्वस्तात विक्री करीत थांबला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

सदरबाबत Unit-२ प्रभारी व.पो.नि. मा. क्रांतिकुमार पाटील सो. याना अवगत करता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वरील स्टाफ ने लागलीच प्राप्त बातमी ठिकाणी धाव घेत इसम नामे अनिल अरुण बोबडे वय २९ रा. सिनेगॉग स्ट्रीट, इमामवाडया समोर फुटपाथवर कॅम्प पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे अंगझडतीत त्याचे कबज्यातून विविध ब्रॅंडचे एकूण ८७०००/- ₹ किमतीचे ०९ महागडे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे.

त्याने सदरचे मोबाइल पुणे स्टेशन व पुणे परिसरातून चोरी केल्याची चौकशीत कबुली दिल्याने त्यास CRPC 41(1)(D) अन्वये ताब्यात घेऊन त्यास Unit-२ कार्यालयात आणून कसून तपास करता, मोबाईल चोरीचे खालील २ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

(1) बंडगार्डन पो स्टे CR No 200/22 IPC 379
(2) फरासखाना पो स्टे CR No 127/22 IPC 379

तसेच इतर ७ मोबाईल बाबत तांत्रिक विश्लेषणा आधारे त्यांचे मूळ मालकांचा शोध घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याची प्रयत्न सुरू आहे. तसेच आरोपी अनिल बोबडे याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही करीता बंडगार्डन पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपीचा गुन्ह्यांचा पूर्वेतिहास :- आरोपी अनिल अरुण बोबडे हा रेकॉर्डवरील अट्टल मोबाइल चोर गुन्हेगार असून यापूर्वी बंडगार्डन पोलिसानी त्याचे कबज्यातून चोरीचे ७५ मोबाइल हस्तगत करून कारवाई केली होती परंतु जामिनावर सुटून त्याने पुन्हा गुन्हे केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले मॅडम, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे पो.अ. शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, समीर पटेल, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, विजय पवार, विनोद चव्हाण, संजय जाधव, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, मोहसीन शेख, गणेश थोरात, गजानन सोनुने, कादिर शेख व नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.

क्रांतीकुमार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट २
पुणे शहर
.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *