पुणे रेल्वेस्टेशन परिसरातुन १७,८५,२०० / – रूपये किंचे एम.डी.अंमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २२/१२/२०२१ अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ गुन्हे शाखा पुणे शहर पुणे रेल्वेस्टेशन परिसरातुन १७,८५,२०० / – रूपये किंचे एम.डी.अंमली पदार्थाची तस्करी करणारे दोघे जेरबंद .

दिनांक २१/१२/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड हे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील स्टाफसह बंडगार्डन पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पुणे स्टेशन पोलीस चौकीकडुन मालधक्का चौकाकडे जाणारे सार्वजनिक रोडवर तुकाराम शेठ शिंदे वाहनतळा समोर पुणे स्टेशन येथे दोन इसम एका अॅक्टीव्हा गाडीवर संशयितरीत्या मिळुन आल्याने त्यांचेकडे कायदेशिर तरतुदींचे पालन करुन झडती घेतली असता ,

इसम नामे १ ) सलीम मुबारक शेख , वय -३७ वर्षे , रा . फ्लॅट नं . १० सहारा अपार्टमेंट नवाजीश चौक , मिठानगर कोंढवा पुणे . २ ) विजय विनोद डेडवालकर वय ३३ वर्षे , रा . ४२३ बरके आळी सोमवारपेठ पुणे . त्यांचे ताब्यात कि.रु. १७.८५,२०० / – चा ऐवज त्यामध्ये अनु.क्र . १ याचे ताब्यात १०४ ग्रॅम ४५० मिलीग्रॅम मेफेड्रॉन ( एम.डी. ) हा अंमली पदार्थ रु १५,६७,००० / – , एक अॅक्टीव्हा गाडी नंबर एम एच क्यु क्यु ३५७० रु ५०,००० / – , एक ग्रे कलरचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा रु .१००० / – , रिकाम्या प्लॅस्टिक पिशव्या रु ०० / ०० , एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल रु १०,००० / – रोख रुपये २,२०० / – , अनु.क्र .२ याचे ताब्यात १० ग्रॅम ००० मिलीग्रॅम मेफेड्रॉन ( एम.डी. ) हा अंमली पदार्थ रु १,५०,००० / – , एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल रु .५,००० / – चा ऐवज व अंमली पदार्थासह अनाधिकाराने , बेकायदेशिररित्या विक्रीकरीता संगनमताने जवळ बाळगताना मिळुन आले . सदर आरोपी यांचे विरुध्द बंडगार्डन पो स्टे गु र नं ३१५/२०२१ , एन . डी . पी . एस . अॅक्ट कलम ८ ( क ) २२ ( क ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक , लक्ष्मण ढेंगळे अंमली पदार्थ विरोधी पथक -१ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहे . ” सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , मा . अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे , गुन्हे शाखा , पुणे , मा . पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा . सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे – २ , श्री लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , सहा पोलीस निरीक्षक , लक्ष्मण ढंगळे , पोलीस अंमलदार , मनोज साळुंके , पांडुरंग पवार , प्रविण उत्तेकर , विशाल दळवी , विशाल शिंदे , संदेश काकडे , योगेश मोहिते यांनी केली आहे .

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *