कोरोनाच्या संसर्गामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..
कोरोनाच्या संसर्गामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू..

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई पोलिसांच्या एका सहाय्यक उपनिरीक्षक पोलिसाचा शनिवारी रात्री उशिरा कोरोनाने मृत्यू झाला.
या व्हायरसमुळे राज्यात आतापर्यंत ७ पोलिसांचा बळी गेला आहे, तर मुंबईत ही संख्या ४ वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाच्या संसर्गामुळे पोलिसांच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे.
यापूर्वी नाशिक ग्रामीणमधील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला होता.कुर्ला पोलीस स्टेशन होते तैनात..
शनिवारी रात्री कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागलेले सहाय्यक उपनिरीक्षक पोलीस सुनील दत्तात्रेय कलगुटकर हे मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तैनात होते.
हे पोलीस स्टेशन कुर्ला झोपडपट्टी परिसरात आहे. या संपूर्ण भागात झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या ३५० हून अधिक झाली आहे, तर महाराष्ट्रातील ही संख्या ७५० च्या वर पोहोचली आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायरसमुळे एकूण ७ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नागरीकांशी थेट संपर्क आल्याने पोलिसांना संसर्ग..
कोरोना व्हायरसमुळे पोलिसांना देखील मोठ्या संख्येने कोरोनाचा संसर्ग होत आहेत आणि हिच परिस्थिती संपूर्ण देशात दिसून येत आहे.
कोरोनाची लागण झालेल्या लोकांशी बर्याचदा पोलीस थेट संपर्कात येतात, ज्यामुळे त्यांना संसर्ग देखील होत असल्याचे समोर येत आहे.