लोहियानगर भागातील मुस्लीम समाजाने केले हिंदू आजीचे अंत्यविधी
लोहियानगर भागातील मुस्लीम समाजाने केले हिंदू आजीचे अंत्यविधी: धर्माआधी माणुसकी महत्वाची

पुणे : भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला आणि शासनाने लाॅकडाऊन घोषित केले.
त्यावेळेस मोहम्मदिया मस्जिद ट्रस्टच्या वतीने लोहियानगर भागातील गरजू नागरिकांना दोन वेळचे जेवण वाटपास सुरुवात करण्यात आली
अशावेळी मस्जिदच्या सदस्यांना शेवंताबाई जाधव वय 85 राहण्यास लोहियानगर या आजी भेटल्या.
त्यांची घरची परिस्थिती खूप घाण होती सर्वत्र उंदीर व खुशीचे साम्राज्य होते तेव्हा घरातील सर्व कचरा व घाण साफ केली व त्यांना लाईटची व्यवस्था करून दिली .
त्यांना कोणीही वारसदार नाही हे लक्षात येताच गेल्या महिनाभर त्यांना दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली आणि त्यांची सेवा केली.
मात्र आज दिनांक 5/4/20 रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याजवळ त्यांचा कोणीही नातेवाईक नाही हे जाणून मोहम्मदिया मस्जिद ट्रस्ट व खतीजा मस्जिद ट्रस्ट च्या वतीने त्यांच्यावर हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले.
या वेळेस ट्रस्टच्या सदस्यांना लोहियानगर पोलीस चौकीचे निरीक्षक गणेश माने यांनी विशेष सहकार्य केले.
माजी. स्वीकृत सभासद : युसूफ शेख ,समीर शेख, शेरू शेख, अर्शद साय्येद, राशीद बावा, जैद शेख, हूसैन शेख,
अजहर शेख शाहरूख हवा, जहॉंगीर भाई, बीलाल भाई, नासीर शेख, रज्जाक बागवान, मोहसीन जन्नत, वसीम शेख,यांनी विशेष सहकार्य केले.