भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालतोय बेली डान्स!

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोरोनाचे कडक निर्बंध असतानाही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालतोय बेली डान्स!

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या नाकाखाली रात्री उशिरापर्यंत पब चालू?

हॉटेल K72 चा मालक काशिदला आशिर्वाद नेमकं कोणाचा.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. प्रतिनिधी, एकीकडे राज्यात कोरोना माहामारीने पुन्हा डोके वर काढले असून दिवसेंदिवस कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारला कडक निर्बंध घालवे लागले आहेत. व त्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

तसेच आता एकीकडे विना मास्क फिरणा-यांवर वर देखील दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून दुसऱ्याकडे पुणे शहरातील पब मध्ये कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहे.

तरी देखील स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पुणे शहरात शुक्रवार-शनिवार-रविवार या तीनही दिवशी पब, हॉटेल मध्ये इव्हेंट ठेवले जात असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींच्या हाती आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिल्लार वाडी येथे हॉटेल K72 रात्री उशिरापर्यंत चालू असून त्या हॉटेलात सर्वच्या सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना भारती विद्यापीठ पोलीसांचे दुर्लक्ष होताना पाहिला मिळाले आहे. हॉटेल K72 मध्ये रात्री बेली डान्स व हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले व ते मोठ्या थाटामाटात पार्टी देखील झाली.

परंतु भारती विद्यापीठ पोलीसांना या बाबतीत खरंच कल्पना नव्हती का? का “वसूलीवाल्यांची” मेहरबानीने व आशिर्वादाने पार्टी पार पडली, पुणे सिटी टाईम्सच्या हाती आलेल्या व्हिडिओ मध्ये पार्टीत कोणीही तोंडावर मास्क लावल्याचे दिसून येतं नाही. तर काही दिवसांपूर्वी हॉटेल K72 मध्ये क्राईम ब्रॉंचने रेड करून हुक्का पार्लरवर कारवाई केली होती.

सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस, कोरोनाचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करणार का? तसेच ज्याच्या हद्दीत डान्स व हुक्का पार्टी जोमात सुरू आहे त्या वरिष्ठांवर देखील पोलीस आयुक्त कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. अधिक माहितीसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना कोरोना झाल्यची माहिती मिळाल्यने पुढील संपर्क होऊ शकला नाही.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *