गोळीबार करुन युवकाचे खनाचे प्रयत्नातील आरोपींच्या बिबवेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

बिबवेवाडी पोलीस ठाणे , पुणे शहर गोळीबार करुन युवकाचे खनाचे प्रयत्नातील आरोपींच्या बिबवेवाडी पोलीसांनी आवळल्या मुसक्या
Feb 10, 2022

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ९८२२३३१५२६

दि .०४/०२ /२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वा . चे सुमारास वाघजाई मंदिर , जनता वसाहत येथे अमित कैलास थोपटे , वय ३२ वर्षे , रा .गल्ली नं.२ , शिवशंकर सोसायटी , बिबवेवाडी ,पुणे

व त्याचा मित्र सुरज झिटे यांची जनता वसाहत येथील सौरभ सरवदे व रुपेश सोनवणे यांचेशी दारु पिणेसाठी पैसे मागितलेचे कारणावरून भांडणे झाली होती . सदर भांडणाचे कारणावरून सौरभ सरवदे , गणेश जगदाळे यांनी दिनांक ०६/०२/२०२२ रोजी रात्रौ ११.०० वा . चे सुमारास त्यांचे १० ते १२ साथीदरांसह ४ ते ५ दुचाकीवरुन हातात कोयते , तलवार व लाकडी दांडके , पिस्टल ( अग्निाशस्त्र ) घेवून शिवशंकर सोसायटी , बिबवेवाडी , पुणे येथे येवून कैलास थोपटे व त्यांचा भाऊ अमोल थोपटे , गणेश मोडावत व गल्लीमधील इतर चार ते पाच जण राहते घरासमोर गप्पा मारत थांबलेले असताना त्यांना शिवीगाळ करुन त्यांचेवर अचानक हल्ला करून पिस्टल(अग्निाशस्त्र ) मधून कैलास थोपटे यास जीवे ठार मारणेचे उद्देशाने त्याचेवर दोन गोळ्या झाडून पळून जाते वेळी हातातील पिस्टल (अग्निाशस्त्र ) व लोखंडी कोयते , तलवार , लाकडी दांडके हवेत फिरवुन परीसरातील नागरीकांमध्ये दहशत निर्माण केले बाबत कैलास थोपटे याने त्यांचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेने सदर बाबत गुन्हा दाखल केला आहे . दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रविण काळुखे व स्टाफ मा.वरीष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना त्यांनी जनता वसाहत झोपडपट्टी पिंजून काढली परंतू पाहीजे आरोपी यांची देखील जनता वसाहत येथे दहशत असलेने त्यांचे बाबत माहीती देणेस लोक समोर येत नव्हते .

आरोपी हे दुसऱ्या पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात व झोपडपट्टीत राहणारे असणारे व त्यांचा कोणताही • ठाव ठिकाणाबाबत माहिती प्राप्त होत नव्हती . बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करता पोलीस अंमलदार सतीश मोरे व श्रीकांत कुलकर्णी यांना त्यांचे बातमी दारामार्फत माहीती मिळाली की , पाहिजे आरोपी सौरभ सरवदे , रा . जनता वसाहत , पर्वती , पुणे हा त्याचे आईला भेटणेसाठी राहते घरी येणार असलेबाबत खात्रीशीर माहीती मिळालेने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कालुखे यंनी तपास पथकातील स्टाफसह दोन टीम तयार करुन पाहीजे आरोपी सौरभ सरवदे याचे राहते घराजवळ जनता वसाहत येथे वॉच ठेवून थांबले असता काही वेळातच मिळालेले बातमी प्रमाणे सौरभ सरवदे हा पायी चालत येत असलेला दिसलेने वरील स्टाफने तात्काळ चारही बाजूने घेराव घालून त्यास जागीच पकडून त्याचे नाव , पत्ता विचारता त्याचे नाव सौरभ दत्तू सरवदे , वय २२ वर्षे,रा.गल्ली नं .७७ , मधला टप्पा , राम मंदिराजवळ , पर्वती पायथा , पर्वती , पुणे असे असलेचे सांगितले . त्यास ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे घेवून येवून त्याचेकडे तपास करता त्याने दाखल गुन्हा हा त्याचे साथीदर फरारी साथीदार

१ ) गणेश जगदाळे ,२ ) मुन्ना सय्यद , ३ ) अकाश शिळीमकर , ४ ) जंब्या साळुंखे , ५ ) अकाश सहानी , ६ ) बाळू नलावडे , रा . जनता वसाहत , ७ ) गौरव बुगे , ८ ) रोहन लोंढे ,९ ) रोहित औचरे , रा . लक्ष्मीनगर , पर्वती , पुणे १० ) अजय आखाडे , रा . धायरी , इतर दोन यांचेसह केलेची कबुली दिली .

त्याचे मदतीने फरारी आरोपींचा शोध घेता आरोपी मुन्ना सय्यद , अकाश शिळीमकर व जंब्या साळुंके हे दिवसभर सिंहगडावर जंगलात थांबतात व अपरात्री घरी येवून पुन्हा जंगलात जातात अशी माहीती प्राप्त झालेने त्यांचा पहाटेचे वेळी राहते घरी शोध घेता ते मिळून आलेने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव

१ ) मुन्ना ऊर्फ अनिस फारुख सय्यद , वय १९ वर्षे रा.गल्ली नं .७७ , राममंदिराजवळ , जनता वसाहत , दत्तवाडी पुणे

२ ) बापु ऊर्फ आकाश सुरेश शिळीमकर , वय २१ वर्षे , रा.गल्ली नं . ७७ , राममंदिराजवळ , जनता वसाहत , दत्तवाडी पुणे

३ ) जंच्या ऊर्फ ऋषिकेश चिठ्ठल साळुंखे , वय २१ वर्षे , रा . गल्ली नं .८० , तिरंगा मित्रमंडळाजवळ , जनता वसाहत , दत्तवाडी पुणे

अशी असलेची सांगितली . त्यांचेकडे दाखल गुन्ह्याबाबत तपास करता त्यांनी दाखल गुन्हा हा वरील साथीदारांसह केलेचे कबुल केले . दरम्यान गुन्हे शाखा युनिट ५ व वर्षे , रा . गल्ली नं .८१ , राम मंदिरामागे ,रा .गल्ली नं .७४ , राम मंदिराजवळ , युनिट ३ यांनी फरार आरोपी आकाश सुरजनाथ सहाणी , वय २४ पर्वती पुणेबाच्या ऊर्फ अदित्य संजय नलावडे , वय २० वर्षे , पर्वती पती पुणे यांना ताब्यात घेवून बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे हजर केलेने वरील आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे यांनी अटक करुन त्यांना मा .न्यायालयामध्ये हजर ठेवले असता मा .न्यायालयाने आरोपी यांची दि . १४/०२/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली आहे .अटक आरोपी यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले एक पिस्टल ( अग्निाशस्त्र ) व एक लोखंडी कोयता व एक तलवार अशी हत्यारे जप्त करणेत आलेली आहेत .

सदरची कामगिरी मा . श्री . नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त सो , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त सो , परिमंडळ -०५ , पुणे शहर , मा . श्री . राजेंद्र गलांडे , सहाय्यक पोलीस आयुक्त साो , वानवडी विभाग , पुणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार श्री . सुनील झावरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बिबवेवाडी पोलीस ठाणे , श्रीमती अनिता हिवरकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , बिबवेवाडी पोलीस ठाणे , पुणे शहर यांच्या सुचने प्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री . प्रविण काळुखे , सहाय्यक पोलीस निरीक्षक , पोलीस हवालदार शाम लोहोमकर , गणेश दुधाणे , पोलीस अंमलदार अमित पुजारी , तानाजी सागर , सतीश मोरे , अतुल महांगडे व श्रीकांत कुलकर्णी यांनी केली.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *