सावकाराच्या जाचातून वृध्द महिलेची सुटका पुणे महानगरपालीकेत झाडु खात्यात कर्मचारी अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सावकाराच्या जाचातून वृध्द महिलेची सुटका पुणे महानगरपालीकेत झाडु खात्यात कर्मचारी(सावकार) अटक.

दिनांक ०७/०२/२०२२ खडक पोलीस स्टेशन , पुणे शहर .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.9822331526

खडक पोलीस स्टेशनची कामगिरी

सावकाराच्या जाचातून वृध्द महिलेची सुटका सावकारास अटक

सदर बाबत अधिक माहिती अशी की , यातील ७० वर्षाची वयोवृध्द महिलेने पाच वर्षापुर्वी नातीचे दवाखान्याचे उपचाराकरीता १०% (टक्के ) व्याज दराने ४०,००० / – रुपये आरोपी नामे दिलीप विजय वाघमारे वय ५२ रा . गंज पेठ पुणे याचेकडुन घेतले होते . त्या बदल्यात महिलेने बँकेत लोन काढुन आरोपीस मुद्दल ४०,००० / – रुपये व व्याजापोटी १ लाख रुपये दिले होते ,

त्यानंतर आरोपी वाघमारे याने त्या वृयोवृध्द महिलेचा अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवुन आणखी व्याज
आहे असे सांगून त्या वयोवृध्द महिलेचे दोन एटीएम कार्ड व पासबुक आरोपी वाघमारे याने काढुन घेतले होते, त्या एटीएम वर जमा होणारी पेन्शनची रक्कम एकुण १६,३४४/- रुपये ही आरोपी दिलीप वाघमारे काढुन घेवुन तिला महिन्याला मोजकीच १ ते २ हजार रुपये देत होता असे त्याने पाच वर्षापासुन ते आतापर्यंत एकुण ८,००,०००/- रुपये (आठ लाख रुपये) बेकायदेशीर व्याजासहीत वसुल करुन आणखी देणे लागत असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासबुक
देण्यास नकार दिला.

त्या वृध्द महिलेला मिळणारी रक्कम ही अपुरे असणारी तिचे दवापाण्यास सदरची रक्कम खर्च होत होती, त्यामुळे तिला उपासमारीची वेळ आल्याने ती सारसबाग गणपती समोर फुटपाथवर भीक मागुन जगत होती. सदर महिला सारसबाग गणपती समोर फुटपाथवर भीक असल्याचे पाहुन त्या ठिकाणी रोजचे रोज दर्शनासाठी येणारे इसमाने तिचेकडे विचारपुस केली असता त्या महिलेने सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर त्या महिलेस त्या इसमाने
घेवुन खडक पोलीस ठाणेस येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भेटुन वयोवृध्द महिलेची व्यथा सांगून लागलीच इसम नामे दिलीप विजय वाघमारे रा. गुरुवार पेठ पुणे याचे विरुध्द सावकार अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयात आरोपी नामे दिलीप विजय वाघमारे रा. ६३३, गंज पेठ पुणे यास अटक करुन त्याचे घरझडतीमध्ये जेष्ठ नागरीक/पेंन्शनधारकांची ८ एटीएम कार्ड व ५ पासबुक असे मिळुन आले. आरोपी हा पुणे महानगरपालीकेत झाडु खात्यात नोकरीस असन त्याने बेकायदेशीरपणे कोणताही सावकारकीचा परवाना नसतांना गरीब
लोकांना त्यांची गरज ओळखुन बेकायदेशीर वाढीव १०% (टक्के) दराने व्याज देवुन व्याजाचा धंदा करीत होता. आरोपीने अशाच प्रकारे आणखी कोणाला त्रास देवुन बेकायदेशीर पणे व्याजाची रक्कम वसुल केली असल्यास त्याबाबत खडक पोलीस ठाणेस संपर्क करावा असे पोलीसांकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

नमुद सर्व कारवाई ही श्री . अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त , श्री . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री.श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्री . यशपाल सुर्यवंशी पोलीस उप निरीक्षक पोलीस अंमलदार श्रीकांत तुळसुलकर , महेंद्र कोलते , मुसा पठाण , बलटू घाडगे यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526.


फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *