मोबाईल, डेबीटकार्डची चोरी करुन सराईतपणे बॅक खाते रिकामे करणा-या चोरटयाला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

मोबाईल, डेबीटकार्डची चोरी करुन सराईतपणे बॅक खाते रिकामे करणा-या उच्च शिक्षीत चोरटयाला बिबवेवाडी पोलीसांनी फरिदाबाद हरियाणा येथून केले जेरबंद.

मोबाईल, डेबीटकार्डची चोरी करुन सराईतपणे बॅक खाते रिकामे करणा-या चोरटयाला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक

बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीत यातील फिर्यादी हे क्रिकेट टुर्नामेंट मॅच खेळण्यासाठी
राजयोग लॉन्स येथे त्याची कार सुझुकी सियाज हि घेवून आले असता पार्क केले ठिकाणी तिचा
दरवाजा लॉक न करता खेळण्यासाठी गेले होते त्यादरम्यान त्याचे गाडीतून सॅमसंग कंपनीचा
टॅब,अॅक्सीस बॅकेंचे दोन डेबीट कार्ड अज्ञात इसमाने चोरी करून नेहून त्यांचे डेबीट कार्डव्दारे १ लाख कॅश काढून व कार्ड व्दारे २,९९,२००/ची खरेदी करून असा एकूण ४,११,२००/- किमंतीच्या मालमत्तेची चोरी केली म्हणून तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा
रजि.नं.८६/२०२२ भादवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हा दाखल झालेनंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन तपासपथक यांनी तपास सुरू करून फिर्यादी यांचे प्राप्त बँक डिटेल्स यावरून आरोपीने पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे व फिर्यादी यांचे एटीएम कार्डवरून बदरपुर हरियाणा येथे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजलेने आरोपी हा विमानाने गेला असल्याचा संशय बळावलेने


लोहगांव विमानतळ पुणे येथे जावून तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून व आरोपीचे तिकीट बुकींगवरून त्याचे नाव व पत्ता टिंवकल अर्जुन अरोरा रा. हाऊस नं. ११४३, सेक्टर नं. ७ सी, बलभगड, जि. फरिदाबाद, राज्य हरियाणा व त्याचा मोबाईल नंबर प्राप्त झालेने त्यावरून


तपास पथकाचे अधिकारी प्रविण काळुखे व अमंलदार यांची टिम तयार करून त्यांना हरियाणा
येथे पाठवून तांत्रिक विश्लेषन करून शिताफीने आरोपीस त्याचे वरील पत्यावर ताब्यात घेण्यात आले त्याचेकडे तपास करता असे निष्पन्न झाले की आरोपी हा B.Tech इंजिनिअर असून कोणत्याही इसमाचा मोबाईल व डेबीट कार्ड चोरी करुन एक दिवसात त्याचे बॅक खाते रिकामे करतो, तसेच त्याचेकडे गुन्हयातील मालाबाबत तपास करून एकूण ३,७४,९००/-किमंतीचे एक अॅपल १३ प्रो व सॅमसंग झेड फोल्ड ३, दोन सोन्याचे कॉईन, रोख रक्कम ४०,०००/- रुपये असा
ऐवज हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


सदर कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व मा. सहा. पोलीस आयुक्त श्री राजेंद्र गलांडे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर,तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार शामराव लोहमकर, संतोष जाधव, सतिश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, अतुल महांगडे, शिवाजी येवले, तानाजी सागर व राहुल शेलार यांनी केली आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *