गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ धडक बाज कामगिरी.

पुणे शहरामध्ये टू व्हीलर मोटर वाहनचोरीचे प्रमाण वाढत चारलेले परमाने दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ ने अनेक वेळे पेट्रोलिंग करत असताना धडक बाज कामगिरी केलेली आहे.

आज रोजी गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -२ कडील स्टाफ विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु र नंबर १५०/२०२२ भा द वि कलम ३७९ चा समांतर तपास करीत असताना पो हवा ५४१२ दिनकर लोखंडे व पो हवा १९८८ विनायक रामाणे यांना बातमी मिळाली की,धानोरी गोकुळनगर पुणे शेजारील मैदानात एक इसम पांढरे रंगाचे मोटार सायकलवर संशयीतरित्या बसलेला आहे.

अशी बातमी मिळाल्याने, आमचे आदेश व सूचनां प्रमाणे अधिकारी सपोनि पाडवी व पो उप निरीक्षक जगताप यांचे सोबत अंमलदार यांनी सदर बातमी प्रमाणे गोकुळनगर धानोरी पुणे येथून त्यास संशयित वाहनसह पकडून नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव

शांतप्पा विठ्ठल देसाई २१ वर्ष, रा आकाश पार्क धानोरी पुणे

असे सांगितले त्याचे कब्जातील होंडा tvistar मोटार सायकलचे मालकी व कागद पत्राबाबत चौकशी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिलेने सदरची मोटार सायकल चोरीची असलेचा संशय आलेने मोटार सायकलसह ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने व त्याचा मित्र आकाश याने चार दिवसापुर्वी मुंजाबावस्ती धानोरी येथून एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल चोरली असलेचे व इतर वारजे माळवाडी व हिंजवडी भागातून दोन मोटार सायकली चोरलेची कबुली दिली तसेच त्याचा मित्र आकाश(पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) मदतीने हिंजवडी पो स्टे हद्दीतुन होंडा शाईन मोटार सायकल, वारजे माळवाडी पो स्टे हद्दीतील हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करणेत आल्या आहे.

http://apcs.in/love-message-to-the-transferred-officers-from-samarth-police-station/

सदर जप्त मोटार सायकली बाबत खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत

1)विश्रांतवाडी पो स्टे गु र नंबर 150/2022 भा द वि कलम 379
2) वारजे माळवाडी पो स्टे गु र नंबर 82/2021 भा द वि कलम 379
3) वारजे माळवाडी पो स्टे गु र नंबर 189/2022 भा द वि कलम 379
4) हिंजवडी पो स्टे गु र नंबर 327/2022 भा द वि कलम 379 असे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सर , मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सर मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शिरगांवकर ,सर यांचे मार्गदर्शनाखाली,सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप तसेच पोलीस अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे,दिनकर लोखंडे,राजेश लोखंडे,विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे, संदीप येळे यांनी केली आहे.

सुनिल पंधरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *