बिबवेवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी

दिनांक – ०६/०८/२०२१ बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर अप्पर परिसरात रोडवर वाढदिवस साजरा करुन दहशत पसरवणा – या आरोपीतांच्या दोन तासात आवळल्या मुस्क्या

ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

आज दि .०६ / ०८ / २०२१ रोजी पोलीस शिपाई ८१६१ शितोळे व पोलीस शिपाई १०५ ९ १ कोठावळे असे मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो , बिबवेवाडी पोलीस ठाणे यांच्या आदेशान्वये वाढत्या गुन्हयांना पायबंद घालण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस शिपाई शितोळे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , दि .०७ / ०७ / २०२१ रोजी मयत आरोपी नामे केशव ऊर्फ भावेश कांबळे याचे वाढदिवसा दिवशी अण्णा भाऊ साठे नगर , अप्पर बिबवेवाडी येथे काही मुलांनी हातामध्ये हत्यार घेवुन रोडवर नाचुन फटाके फोडून भावेश याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे असे सांगुन तो व्हिडीओ पोलीस शिपाई शितोळे यांनी पोलीस ठाणेचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री उसगावकर यांना दाखवुन सदर व्हिडीओची पाहणी केली असता त्यामध्ये तपास पथकातील अधिकारी व अंमलदार ओळखत असलेले इसम नामे प्रसाद कानिटकर याच्या हातामध्ये पिस्टल , नागेश आष्टगे याचे हातामध्ये पालघन , विजय कट्टमणी , संजय कोळी , अजय पवार व इतर दोन यांनी मयत आरोपी नामे केशव उर्फ भावेश कांबळे याचा आण्णाभाऊ साठे वसाहतीमधील सार्वजनिक रोडवर मृत्यू पश्चात वाढदिवस साजरा करुन त्यांनी हातामध्ये पिस्टल , पालघन असे घातक हत्यारे घेवुन त्याचा व्हिडीओ तयार करुन तो वसाहतीमधील नागरीकांमध्ये दहशहत पसरविण्याचे उद्देशाने व्हायरल केल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा दाखल करुन दोन तासामध्ये सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले आहे .

ONLINE PORTAL NEWS

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर श्री नामदेव चव्हाण मा . पोलीस उप आयुक्त साो , परिमंडळ -०५ , पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील मा.सहा.पोलीस आयुक्त साो , वानवडी विभाग , पुणे शहर श्री राजेंद्र गलांडे , यांच्या मार्गदर्शना नुसार श्री सुनील झावरे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस ठाणे , श्रीमती अनिता हिवरकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या सुचने प्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री राजेश उसगावकर , सहा.पोलीस निरीक्षक , पोलीस शिपाई अमित पुजारी , राहुल कोठावळे , अमोल शितोळे , तानाजी सागर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *