रिक्षात विसरलेली बॅग , शोध घेवून मुळ मालकाचे ताब्यात दिले . बंडगार्डन पोलीस स्टेशन ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – ० ९ / ०७ / २०२१ बंडगार्डन पोलीस स्टेशन , पुणे शहर सोन्याचे दागिने , रोख रक्कम व कपडे असा ऐवज असलेली रिक्षात विसरलेली बॅग , शोध घेवून मुळ मालकाचे ताब्यात दिले .

ONLINE PORTAL NEWS

दिनांक ०८/०७/२०२१ रोजी पोलीस उप – निरीक्षक राहुल पवार हे ठाणे अंमलदार म्हणून दिवसपाळी कर्तव्य करीत असताना , महिला नामे लिलाबाई चांगदेव भिडे रा . ४५ वर्षे राहणार वाघेश्वरनगर , वाघोली , पुणे या बंडगार्डन पोलीस ठाणेस आल्या व त्यांनी कानातील , गळयातील असे अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख ५,००० / – रूपये कपडे असे किमंती ऐवज असलेली बॅग , पुणे स्टेशन येथे एका रिक्षामध्ये विसरली असले बाबत सांगितले .

पोलीस उप – निरीक्षक राहुल पवार व पोलिस अंमलदार प्रकाश सांवत यांनी बंडगार्डन पोलीस ठाणेस उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही . फुटेजची पाहणी करून सदर रिक्षा नंबर शोधून , तात्काळ त्या रिक्षा नंबरचे मालकाचा नाव व पत्ता , मोबाईल नंबर मा . प्रादेशिक परिवहन अधिकारी साो . यांचेकडून प्राप्त करून घेतला . त्यानंतर रिक्षाचालकास फोन करून विचारणा केली असता , त्याने बॅग रिक्षात विसरली असल्याबाबत सांगुन . माझे रिक्षात पॅसेंजर असल्याने मला लगेच पोलीसांकडे येता आले नाही . मी बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे येत आहे असे सांगितले . रिक्षाचालक ईस्माईल सय्यद हे पोलीस स्टेशन येथे , महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबासाहेब कांबळे यांचे सोबत आले व त्यांनी पोलीसां समोर लिलाबाई चांगदेव भिडे यांची सोन्याचे दागिने , रोख रक्कम , कपडे असे ऐवज असलेली बॅग परत केली .

पोलीस उप – निरीक्षक राहुल पवार व पोलिस अंमलदार प्रकाश सांवत , अमित बधे यांनी दोन तासांत लिलाबाई चांगदेव भिडे यांची किमंती ऐवज असलेली बॅग ताब्यात दिलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *