चतुःशृंगी पोलीसांनी गुन्हयातील आरोपीना केली अटक
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दिनांक- ०८/०७/२०२१ चतुःशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चतुःशृंगी पोलीसांनी एम.एस.ई.वी.चे डिपी तोडून साहित्य चोरणा – या गुन्हयातील आरोपीना पकडून त्यांचेकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत केला .
ONLINE PORTAL NEWS
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये घडणा – या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता श्री.पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त , पुणे शहर यांनी आढावा घेवून दाखल गुन्हे उघडकीस आणणे करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन अंतर्गत पथक तयार केले होते.त्याप्रमाणे नेमलेले पथकाने मागील काही महिण्यांमध्ये झालेल्या सर्व गुन्हयांचा एकत्रित अभ्यास केला .
त्याप्रमाणे तपास पथक व बिट मार्शल हे आरोपी बाबत तपास करीत असताना दिनांक २८/०६/२०२१ रोजी बाणेर मार्शल वरील अमंलदार प्रविण शिंदे व दत्ता गेंगजे हे मिटकॉन कॉलेज बालेवाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना अल्टो कार मधून आलेले दोन इसम हे निकमार समोरील महावितरण चे पोलवरील ट्रान्सफार्मर मधील तांब्याचे कॉईल चोरून घेवून जात असताना आरोपी नामे
१ ) मोहमद फारूख रोशन चौधरी , वय ३३ वर्षे रा , जानकीपाडा रांज ऑफिस शेजारी , वसई , जि.ठाणे मुळगाव मलगय्या , पो ढेगाहरी तहसिल सोहरतगड जि.सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश
२ ) कृष्णबिहारी रामभरोसे यादव वय २९ वर्षे रा.टिटवाला बनेली चौक ता , कल्याण , जि.ठाणे मुळ नोबस्तान पो नारायणपुर , तहसिल तुलसीपुर जि बलरामपुर , उत्तरप्रदेश यांना त्यांचे अल्टो कार क्रमांक एम एच .०६.एम .४८९० सह पकडले . त्यांचेविरूध्द एम.एस.ई.बी.चे अभियंता आयटीआयरोड शाखा बाणेर पुणे यांनी तक्रार दिलेने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२९१ / २०२१ भादवि कलम ३७९ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून २,१७,००० / -कि.रू चे तांब्याचे वायईडींग १६० किलो सह एक अल्टो कार असा माल हस्तगत करण्यात आला आहे . सदर आरोपी हे महावितरण्याच्या लाईटचे पोलवरील ट्रॉन्सफर मधील वाईडींगच्या तांब्याचे कॉईल चोरतात.त्यांनी खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे तपासामध्ये उघडकीस आले आहे . १ ) पोलादपुर पो.स्टे.गुन्हा रजि.नं .०१ /२०२१ भादवि कलम ३७९ , ४२७ २ ) पोलादपुर पो.स्टे गुन्हारजि . नं .०६ / २०२१ भादवि कलम ३७९ , ४२७
३ ) भाईसर पो.स्टे.गुन्हा रजि.नं .१३५ / २०२१ भादवि कलम ३७९ ४ ) भोईसर पो.स्टे गुन्हा रजि.नं .२५६ / २०२१ भादवि कलम ३७९ , ४२७
५ ) भोईसर पो.स्टे गुन्हा रजि.नं .२४६ / २०२० भादवि कलम ३७९ , ४२७ तसेच चतुःश्रृंगी पो.स्टे गुन्हा रजि.नं .२७० / २०२१ भादवि कलम ४५४,४५७.३८० या गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अमलदार दिनेश गडाकुंश , आशिष निमसे यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे किरण नागेश विटकर वय २४ वषे रा सोमेश्वर मंदिराजवळ जनता वसाहत जनवाडी पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयातील एकूण १,१०,७८० / -कि रू दोन एसी व दोन जुने मायक्रोव्हेव हस्तगत करण्यात आले आहेत . तसेच चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं .२९४ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे यु बौंड बॅड इंडिया प्रा.लि.बाणे पुणे यांचे इंटरनेट बॅटरी चोरीस गेलेबाबत गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास करीत असताना पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपी नामे टिकाराम दिगंबर नेमाडे , वय २१ वर्षे रा.चिंतामणी चौक शिवप्रसाद कॉलनी बी / ३८ , वाल्केकरवाडी पुणे मुळ – पाटीलपुरा , लहान मारूती जवळ , ता रावेत.जि.जळगांव याचा शोध घेवून त्याचेकडून गुन्हयातील ११,००० / -कि रू च्या एकूण एचबीएल कंपनीच्या २६ एच पावरच्या एकूण ०५ बॉट – या हस्तगत केलेल्या आहेत .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सदर कारवाई ही मा अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये मा . पोलीस उप आयुक्त श्री पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर व मा.सहा.पोलीस आयुक्त श्री रमेश गलांडे खडकी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे , पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक महेश भोसले मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार प्रविण शिंदे , दत्ता गेंगजे , दिनेश गडांकुश आशिष निमसे , प्रकाश आव्हाड , मुकुंद तारू , ज्ञानेश्वर मुळे , श्रीकांत वाघवले . इरफान मोमीन , प्रमोद शिंदे , संतोष जाधव , सुधीर माने , पोशि अमोल जगताप व तेजस चोपडे यांच्या पथकाने केली आहे . सदर प्रकरणी पुढील अधिक तपास पोउनि महेश भोसले हे करीत आहेत .
ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526