कोंढवा पुणे येथे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल

कोंढवा पुणे येथे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल
जबाब दिनांक 05.03.2021 मी सतीश भास्कर काळे,वय 47,धंदा.इलेक्ट्रिक दुकान, रा.402,अश्विनी क्लासिक्स, एनआयबीएम रोड,कोंढवा,पुण,48 मो.क्र. 8999910906,9881030007 समक्ष पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहुन लिहून देतो की,मी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून बहुजनांना संविधानिक मार्गाने न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे,तसेच दिनांक 02.03.2021 रोजी इसम नामे मिलिंद रमाकांत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे(कार्याध्यक्ष) यांनी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगल घडवून मनुष्यहानी आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमवून एकत्रित संघटित करून गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट,बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली आहे व सदरील भाषण हे आरोपीने दंगली घडून दहशत माजविण्याचा हेतूने हेतुपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित केली आहे तसेच एक आक्षेपार्ह मजकुराचे पत्र पुणे महापालिका आयुक्तांना दिलेले आहे. सदरील भाषणाचे वक्तव्य पुढीलप्रमाणे…….
कोंढवा मध्ये हज हाऊस बनविण्याचे काम पुणे महापालिकेने चालू केले आहे,ते अतिशय आश्चर्यकारक व धक्कादायक आहे, कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे,याठिकाणी अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे, केंद्रीय गुप्तचर खात्याचा तसा अहवाल आहे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल असा अतिशय घाणेरडा निर्णय महापालिकेने घेतला आहे, महापालिकेने जनतेच्या विकासासाठी जे पैसा खर्च होणे अपेक्षित आहेत ते पैसे हाउसच्या बांधकामासाठी खर्च करायचा ठरलेला आहे,चार कोटी रुपये महापालिका प्रशासनातर्फे हज हाऊस साठी तरतूद करण्यात आलेली आहे,अमेनिटी स्पेस मध्ये सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हाऊस चे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांनी शोधून काढलेली आहे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की,प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम करण्यात येणार नाही,परंतु सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता घेऊन धूळफेक करून महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे,समस्त हिंदू आघाडी आपली ताकत पणाला लावेल,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की,समस्त हिंदू आघाडी काही झालं तरी महापालिका प्रशासनाच्या हज हाउस मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही,जय श्रीराम
सदरील संभाषण हे धार्मिक व जातीय भावना दुखण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, तसेच धर्माच्या नावाने जातीय दंगली घडविण्याच्या हेतूने सदरील आरोपीने जाणीवपूर्वक हेतूपुरस्पर ने शत्रुत्व वाढविणे आणि हिंदू-मुस्लीम एकोपा टिकविण्यास बाधक असे सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे माझ्या कोंडवाकरांची व कोंडवे याची गंभीर स्वरूपाची बदनामीची वक्तव्य केले आहे,तसेच सदरील वक्तव्यामुळे पुण्यामध्ये विशेषत: कोंढवा परिसरातील शांतता भंग होऊन जातीय दंगली घडविण्याच्या हेतूने केले आहे व तसे झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मिलिंद रमाकांत एकबोटे हेच राहतील म्हणून दिनांक 02.03.2021 रोजी मिलिंद रमाकांत एकबोटे समस्त हिंदू आघाडीचे (कार्याध्यक्ष) यांनी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्य आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने व हेतूने लोकांना जमवून एकत्र संघटित करून गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केलेली आहे व सदरील भाषण हे आरोपीने दंगल घडून दहशत माजविण्याचा हेतूने हेतुपुरस्सर सदरील भाषणाचे चित्रीकरण करून ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारीत केलेले आहे,तसेच एक आक्षेपार्ह मजकुराचे पत्र पुणे महापालिका आयुक्तांना दिले आह, या सामाजिक कामासाठी दंगली घडविण्याच्या कृत्यासाठी जगविख्यात राजे सबंध बहुजन समाजाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करून महापुरुषांच्या नावाची बदनामी केली आहे म्हणून आरोपी मिलिंद रमाकांत एकबोटे, राहणार 1170/33,श्री गणेश मंदिरामागे,शिवाजीनगर,पुणे
यांचे विरुद्ध माझी तक्रार आहे, माझं जवाब मराठीत टंकलिखित केलेला असून तो मी वाचून पाहिला असता तो मी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे.
रात्री उशिरा एक वाजता कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. २१३/२०२१
मिलिंद एकबोटे यांच्या वर एकूण 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
(1) १५३ (2) 153-A (3)153- B, (4) 295-A (5) २८९ (6)५०० (7)५०१ (8)५०२ (9)५०५(१)(क) (10) ५०५(२). (11) 120-B (12)३४ (13)६६(अ) (14)66(B)
“”””””””””””””””””””””””””””””””””””‘””””