पुण्यात,AMIM चा उमेदवार जाहीर;अनिस सुंडके यांची पुणे लोकसभेच्या मैदानात उतरणार,वसंत मोरे ,मुरलीधर मोहोळ,धंगेकर, या तिघांची अडचणी वाढणार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
अनिस सुंडके नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, लहान भाऊ रईस सूंडके नगरसेवक, तर अनिस सुंडके यांची पत्नी हमिदा सुंडके पुणे मनपा 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आल्या होत्या.
आता अचानक अनिस सुंडके यांची पुणे लोकसभेच्या लढतीत एंट्री झाली आहे.
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून अनिस सुंडके यांना AIMIM कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुंडके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

अनिस सुंडके राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे आता पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.अनिस सुंडके हे पुण्यातील कोंढवा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.त्यांचा हा भाग शिरुर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. काही दिवसांपासून सुंडके हे शिरुरचे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होते. मात्र सुंडके यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं आहे.पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार आहोत.
निवडणूक लढविली पाहिजे, अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुणे लोकसभा निवडणुकीत ‘AIMIM उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील, असा विश्वास खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे. अनिस सुंडके यांच्या निवडणुकीत उतरल्याने पुणे लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्यातच आता रवींद्र धंगेकरांच्या मतांचं विभाजण होणार असल्याचं बोललं जात आहे.
सुरुवातीला मुस्लिम धर्माची मतं हे रवींद्र धंगेकरांना मिळतील आणि त्यांच्या मतांचा आकडा वाढेल, असं बोललं गेलं. मात्र आता अनिस सुंडके यांच्या मैदानात उतरल्याने मुस्लिम मतांची विभागणी होऊन त्याचा फटका थेट या तिघांना बसणार आहे. धंगेकरांचं टेन्शन वाढणार?

मागील 25 वर्षांपासून पुण्यात काम करत आहोत. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. पुण्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहे. हे प्रश्न आधीदेखील सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्व जाती-धर्माचे माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्यास काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काम केलेले आहे.पुणे महानगर पालिकेत पण काम केलं आहे आणि माझा लोकांशीदेखील संपर्क चांगला आहे, असं अंनिस यांनी म्हटलं आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(APCS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
