वाहन चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त,दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पेट्रोलिंग करत असताना,दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची पो.हवा.दत्तात्रय खरपुडे, ए एस आय अशोक आटोळे,एक आरोपीला केली अटक,
पुणे, दि. २० (प्रतिनिधी) शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे हडपसर पो.स्टे हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना पो.हवा. दत्तात्रय खरपुडे, ए एस आय अशोक आटोळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,एक इसम हा माळवाडी येथे जुन्या कॅनलच्या बाजुला एक नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर गाडीवर बसलेला असून ती चोरीची आहे.
शाबीर असलम नदाफ (वय २२, रा. भेकराईनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे कर्मचारी गस्तीवर होते. या दरम्यान एक इसम हा माळवाडी येथे जुन्या कॅनलच्या बाजूला स्प्लेंडर गाडीवर बसलेला असून, ती चोरीची असल्याची माहिती अंमलदार दत्तात्रय खरपुडे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नदाफला ताब्यात घेतले.,

शाबीर असलम नदाफ वय 22, रा. बालाजी ट्रेडर्स समोर शिवशक्ती चौक भेकराईनगर हडपसर , पुणे असे सांगितले असून त्याचे ताब्यात मिळालेल्या दुचाकीचे मालकी व कागदपत्र बाबत विचारले असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यास अधीक चौकशीकामी आमचे कार्यालयात आणुन सदर गाडी बाबत अधिक माहिती घेतली असता, त्याने सांगितले की , सदरची दुचाकी त्याने हडपसर भागातुन चोरी केल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने अजून 2 गाड्या चोरी केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपी कडुन 3 गुन्हे उघडकीस आणले आहे,सदर आरोपीकडून एकुण1,20,000 /- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कारवाई करणेकामी हडपसर पो.स्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही , श्री. शैलेश बलकवडे सो.अपर पोलिस आयुक्त गुन्हे, श्री.अमोल झेंडे सो पोलिस उपायुक्त गुन्हे , श्री. सतिश गोवेकर सो सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २, वपोनि अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली ,पोलीस अंमलदार अशोक आटोळे, दत्तात्रेय खरपुडे, , गिरमकर, गोसावी, सकपाळ, राजेश अभंग यांनी केली आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in