सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

दिनांक १४/०६/२०२१ सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद

मा.पोलीस आयुक्त , सो पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपींना चैक करन जबरी चोरी व इतर गुन्हयाचे प्रतिबंधाबाबत सुचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने गुन्हे शाखा , युनिट -२ यांचेकडून विशेष मोहीम राबवुन कारवाही करण्यात आली

दिनांक १४/०६/२०२१ सराईत गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट २ कडुन जेरबंद मा.पोलीस आयुक्त , सोा.पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपींना चेक करुन जबरी चोरी व इतर गुन्हयांचे प्रतिबंधाबाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा , युनिट -२ यांचेकडुन विशेष मोहीम राबवुन कारवाही करण्यात आली . दिनांक ११/०६/२०२१ रोजी पो.ना. चेतन गोरे यांना माहीती मिळाली की , हडपसर पोलीस स्टेशन मधील जबरी चोरी करणारे सराईत आरोपी व पोलीस अभिलेखा वरील आरोपी नामे १ ) संजय ऊर्फ सोन्या हरिष भोसले . व २ ) पुरषोत्तम ऊर्फ बंडया राजेंद्र वीर हे इसम ससानेनगर येथे येणार आहेत . लागलीच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी . प्रकाश मोरे , पो.ना.चेतन गोरे , पो.हवा.वग्गु , पो.ना.महाजन असे रवाना होवुन खात्री करता मिळालेल्या बातमीतील आरोपी ससानेनगर रेल्वे फाटकाजवळ अॅक्टीव्हा दुचाकी सह थांबलेले दिसले . त्यांना स्टॉफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नावे १ ) संजय ऊर्फ सोन्या हरिष भोसले.वय -२१ वर्षे , रा – हांडेवाडी हडपसर , पुणे व २ ) पुरषोत्तम ऊर्फ बंडया राजेंद्र वीर . वय -२५ वर्षे , रा- नांदेडफाटा , सिंहगड रोड , पुणे अशी असल्याचे सांगितली . त्याचे ताब्यात एक अॅक्टीव्हा गाडी मिळुन आली त्याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक माहीती देऊ न शकल्याने त्याने ती कोठुनतरी चोरुन आणले असल्या बाबत संशय आल्याने नमुद ईसमास अटक करुन त्याचेकडे अधिक तपास करता त्यांचेकडे १ ) हडपसर पोस्टे गुरनं .४२९ / २१ भादवि कलम ३९२,३४१,५०६,३४ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) , २ ) सिंहगड पोस्टे गुरनं .२३८ / २०२१ भादवि कलम ३७९ , ३ ) सहकारनगर पोस्टे गुरनं . १४४/२०२१ भादवि कलम ३८०,३४ ( ज्वेलर्स दुकानातील चोरी ) असे गुन्हे उघडकीस आले . त्यांचेकडे तपास करुन वरील ३ गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन १,८२,३०० / -रु किमंतीचा मुद्देमाल त्यात १ सोन्याची चेन , २ दुचाकी गाडया , १ मोबाईल तसेच १ कोयता जप्त करण्यात आला आहे . आरोपीचा दिनांक १७/०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे.वरील आरोपी हे अभिलेखावरील दरोडा , जबरी चोरी , वाहन चोरी , घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत . सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त श्री अशोक मोराळे , साो मा.पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे साो , मा सहा . पोलीस आयुक्त श्री सुरेंद्रनाथ देशमुख साो . व मा पो.निरी . श्री महेंद्र जगताप युनिट -२ गुन्हे शाखा पुणे शहर . यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी . प्रकाश मोरे , सहा.पो.निरी . वैशाली भोसले , सहा.पोलीस फौजदार यशवंत आंब्रे , सलीम पठाण व पोलीस अमंलदार अस्लम पठाण , किशोर वग्गु , चेतन गोरे , उत्तम तारु , चंद्रकांत महाजन , निखील जाधव , समीर पटेल , गोपाळ मदने , व मपोशि अरुणा शिंदे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *