१५ वर्षीय मुलीचे कुशीनगर एक्सप्रेसमधून अपहरण

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE PORTEL

१५ वर्षीय मुलीचे कुशीनगर एक्सप्रेसमधून अपहरण
१९ वर्षांच्या मजनूला कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

ON LINE PORTEL NEWS 9822331526

  कल्याण - आईसोबत गावी जाणाऱ्या १५ वर्षीय मुलीला कुशीनगर एक्सप्रेसमधून पळवणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कारवाई कल्याण लोहमार्ग गुन्हे शाख पथक ३ ने केली. या आरोपीला पुढील कारवाईसाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
 सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अजित विश्वकर्मा (१९) याचे मुंबईतील मानखुर्द परिसरात राहणाºया १५ वर्ष ५ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्या दोघांना लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला आणि मुलीला घेऊ न तिची आई कुशीनगर एक्सप्रेसने गावी जाण्यास निघाली. हे माहीत पडताच अजितही कुशीनगर एक्सप्रेसने प्रवास करू लागला. दरम्यान कल्याण स्थानक येण्यापूर्वी एक्सप्रेस थांबताच अजित अल्पवयीन प्रेयसीला घेऊ न पळाला. 
  दरम्यान, एक्सप्रेस कल्याण स्थानकात येताच मुलगी बेपत्ता झाल्याचे महिलेला समजले. तिने तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. ४२०/२०२१) ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊ न कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष ३ चे पथकदेखील मुलीचा शोध घेऊ  लागले. 
तपासादरम्यान काही तांत्रिक माहितीचे विश्लेषण केला असता बेपत्ता मुलगी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत असल्याचे समजले. त्यानुसार कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथकाने सागर्ली गावातून मुलीला व तिचा प्रियकर अजित विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. 
 ही कौतुकास्पद कारवाई मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद, मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त एम. एम. मकानदार, कल्याण लोहमार्ग गुन्हे प्रकटीकरण पथक ३ चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, हवालदार दिवटे, पोलीस नाईक कर्डिले, पोलीस नाईक माने, महिला पोलीस अंमलदार पाटील आदी पथकाने केली.

ON LINE PORTEL NEWS 9822331526

CHIFE EDITOR WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *