पुणे शहर क्रुर पध्दतीने केलेल्या खुनातील आरोपींना चोविस तासातच केले जेरबंद.

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE POTEL

दत्तवाडी पो . ठाणे गुन्हा रजिस्टर नं .१३० / २०२१ , भा.द.वि. कलम ३०२,१२० ( ब ) , ३२३,५०४,१४३,१४६,१४७ , १४८,१४ ९ , महा . पोलीस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ) सह कलम १३५ , ऑर्म अॅक्ट ४ ( २५ ) व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट कलम ७ मधील पाहीजे आरोपी यांची माहीती काढत असताना पो.हवा.सुधीर घोटकुले , पो.अंम.शिवाजी क्षीरसागर व सागर सुतकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , “ दि . १३/०६/२०२१ रोजी रात्रौ ०८/०० वा . चे सुमारास पर्वती पायथा येथे इसम नामे सौरभ वाघमारे यास कोयत्यांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांना जीवे ठार मारणारे मुलांपैकी तीघेजन हे सध्या जनता वसाहत वाघजाई मंदिराजवळ पुणे येथे एकत्र थांबलेले आहेत . ” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आम्ही ती बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो , यांना कळविली असता त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक विजय खोमणे ( गुन्हे ) यांचेसह तपास पथक अधिकारी स्वप्नील लोहार व स्टाफ असे जावुन सापळा रचुन पकडणेबाबत कळविल्याने वरील स्टाफसह बातमीच्या ठिकाणी जनता वसाहत पर्वती टेकडीवरील वाघजाई मंदिराजवळ येथे जावुन तेथे थोडे आडबाजुस थांबुन बातमीप्रमाणे खात्री केली असता बातमीतील वर्णनाचे तीघे इसम हे वाघजाई मंदिराजवळ मंदिराचे लाईटचे उजेडात थांबलेले आम्हास दिसुन आल्याने आम्ही आमचे बरोबरील स्टाफच्या दोन टिम तयार करुन सापळा रचुन त्यांना अंत्यत शिताफिने पकडले त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी आपली नावे १ ) वृषभ दत्तात्रय रेणुसे , रा.आंबेगाव पठार , पुणे , २ ) सचिन ऊर्फ दादा प्रकाश पवार , रा.जनता वसाहत , पुणे व ३ ) आकाश उध्दव नवाडे ,, रा.आंबेगाव पठार , पुणे व इतर तीन विधीसंघर्षीत बालक यल्लमा देवी मंदीर जनता वसाहत , पुणे या ठिकाणी मिळाले . यातील आरोपी वृषभ दत्तात्रय रेणुसे याचा भाचा संग्राम लेकावळे याचा यातील मयत सौरभ वाघमारे व त्याचे साथीदारांनी दि . २१/०४/२०२१ रोजी खुन केला होता . त्याचा राग मनात धरुन वृषभ दत्तात्रय रेणुसे व यातील इतर आरोपी यांनी कट रचला व यातील आरोपी अक्षय विनोद वीर व मयत इसम सौरभ वाघमारे यांचे जेल मध्ये झालेले ओळखीचा फायदा घेवुन अक्षयला सौरभ वाघमारे यास पर्वती पायथा येथे बोलावून घेण्यास सांगुन त्याप्रमाणे अक्षयने इन्स्टाग्रामवरुन सौरभ वाघमारे याचेशी संपर्क करुन त्यास स्वस्त किंमतीत मोबाईल देतो असे सांगुन पर्वती पायथा येथे बोलावून घेतले असता सौरभ वाघमारे हा त्याचा मेहुना दादासो बनसोडे यांचेसह पर्वती पायथा येथे आला सौरभ वाघमारे याचेवर अचानक हल्ला करुन त्याचे डोक्यावर , पाठीवर व हातावर तीक्ष्ण कोयत्याने वार करुन अतिशय निघुनपणे त्याचा एक हात तोडुन खुन केला . दाखल गुन्हयांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक , विजय खोमणे ( गुन्हे ) हे करीत आहेत . सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा अपर पोलीस आयुक्त , श्री.संजय शिंदे , पश्चिम प्रादेशीक विभाग , मा.पोलीस उप – आयुक्त , श्रीमती.पौर्णिमा गायकवाड , परि -३ मा.सहा.पोलीस आयुक्त , श्रीमती.पोर्णिमा तावरे , सिंहगड विभाग वरीष्ठ पोलीस निरीक्षक , कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक , ( गुन्हे ) , विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप – निरीक्षक , स्वप्नील लोहार , पो.हवा.सुधीर घोटकुले , कुंदन शिंदे , पोलीस अंमलदार , सागर सुतकर , महेश गाढवे , अमित सुर्वे , शिवाजी क्षीरसागर , राहुल ओलेकर , नवनाथ भोसले , प्रमोद भोसले , शरद राऊत , विष्णु सुतार , यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE POTEL

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *