पुणे शहर ७ वर्षापासुन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेला आरोपी जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ON LINE POTEL

पुणे शहर ७ वर्षापासुन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात फरार असलेला आरोपी जेरबंद.

गुन्हे शाखा , युनिट -६ ,

दिनांक १४/६/२०२१ रोजी गुन्हे शाखा , युनिट -६ , पुणे शहर कडील सपोनि.नरेंद्र पाटील व पोलीस अंमलदार युनिट हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक गस्त करित असताना पोशि.ऋषिकेश व्यवहारे व पोशि.ऋषिकेश ताकवणे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , लोणीकंद पोलीस स्टेशन गुरंन .३७३ / २०१४ , भादवि कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९ या दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे शंकर मनोहर कांबळे , वय -३३ , रा.काळे ओढा केसनंद रोड , वाघोली , पुणे हा केसनंद रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने , सदरबाबत पोलीस निरीक्षक , गणेश माने , गुन्हे शाखा , युनिट -६ , पुणे यांना कळविले असता , त्यांनी सदर बातमीची खातरजमा करून बातमी प्रमाणे नमुद इसम मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचुन बातमीतील नमुद वर्णनाचा इसम सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व दाखल गुन्हयाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाही करिता लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे . आरोपीत इसम हा मागील ७ वर्षांपासुन आपले वास्तव्याचे ठिकाण बदलुन राहत होता व त्याचेबाबत माहिती मिळाल्यास पोलीसांना गुंगारा देऊन फरार होत असे . सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह – आयुक्त , डॉ.रविंद्र शिसवे , मा अपर पोलीस आयुक्त , श्री अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , मा . पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा , युनिट -६ चे पोलीस निरीक्षक , गणेश माने , सपोनि.नरेद्र पाटील , पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके , ऋषिकेश ताकवणे , ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार , ऋषिकेश टिळेकर , नितीन धाडगे , नितीन मुंढे , प्रतिक लाहिगुडे , कानिफनाथ कारखिले , नितीन शिंदे , शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे .

CHIFE EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *