सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत मंत्री मार्केट जवळ , सार्वजनिक ठिकाणी खेळत असलेल्या अवैध मटका जुगार धंद्यावर छापा.

ACS POLICE CRIME SQUAD WAJID S KHAN

सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा

पुणे शहर सार्वजनिक ठिकाणी खेळत असलेल्या अवैध मटका जुगार धंद्यावर छापा.

मा.पोलीस आयुक्त साो , पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणुन पद्भार स्विकारल्यानंतर शहरातील अवैद्य धंदे , अवैद्य कारवाया तसेच लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करण्यासंदर्भातील धोरण स्विकारले आहे व त्यासंदर्भात आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत . दिनांक २०/०५/२०२१ रोजी हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत मंत्री मार्केट जवळ , मोकळया मैदानात असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये काही इसम मटका जुगार खेळत आहे अशी माहिती मा.पोलीस आयुक्त साो , पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी बातमीचे अनुषंगाने सदर ठिकाणी छापा टाकुन कारवाई करणेबाबत आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा चव्हाण यांना दिले . बातमीचे अनुषंगाने सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक , शिल्पा चव्हाण यांनी त्यांचेकडील स्टाफ व मदतीकामी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील स्टाफ बोलावुन मंत्री मार्केट जवळ , हडपसर , पुणे येथे जावुन सदर बातमीची खातरजमा करुन मंत्री मार्केट जवळ , मोकळया मैदानात असलेल्या पत्र्याचे शेड मध्ये मटका जुगार खेळत असलेबाबत माहिती मिळाल्यावरुन तात्काळ पडताळणी करुन सदर ठिकाणी छापा टाकला असता किं रु १,६८,१ ९ ० / – रोख रक्कम व जुगाराचे साहित्य सह माल जप्त करुन जुगार घेणारे व खेळणारे असे एकुण ०८ इसमांविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन , पुणे येथे गुन्हा रजि नं ३८१/२०२१ , महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री . अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा , पुणे शहर श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे पुणे श्री.श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे श्री . सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण , ( अति कार्य ) सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर , श्रीधर खडके , पोलीस उप निरीक्षक , सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा , पुणे शहर , यांचे पथकाने तसेच दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पथकाने केली .

ACS POLICE CRIME SCENE WAJID S KHAN

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *