१४ वर्षापासून फरार असलेल आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखा चे ताब्यात.
तब्बल १४ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या:दरोडा पथक,गुन्हे शाखा ची कार्यवाही.
गेली काही वर्षे पासून फरार असलेल्या आरोपीला मुंब्रा पोलिस शोध घेत होती याकरता मुंब्रा पोलीस स्टेशन सर्व पोलिस स्टेशन मधील कळवला होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखा,पुणे शहर पेट्रोलिंग करत असताना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथील गुन्हा
गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे अली रझा परवेज इराणी हा क्रोम मॉल समोर , वानवडी सोलापुर रोड पुणे येथील कब्रस्तान मध्ये आलेला अशी खात्रीशिर बातमी पोलीस शिपाई अमोल सरतापे मिळालेने मा वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री सुनिल पंधरकर सो यांना कळवले यानंतर त्याला अटक करण्यात आला.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२गुन्हे शाखे कडील
पोउपनिरी गुंगा जगताप,सहा पो उप निरी उदय काळभोर, पो हवा दिनकर लोखंडे , पो हवा राजेश लोखंडे , पो ना गणेश लोखंडे , पो शि अमोल सरतापे असे सर्व मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे अधिपत्याखाली हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत मगरपट्टा ओव्हर ब्रिजखाली आलो असताना , पोलीस शिपाई अमोल सरतापे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथील गुन्हा रजि . नं .१४० / २००७ भादवि क १४३ , १४७ , १४९ , ३२३ , ३७० , ३६४ ४२७ , ५०६ ( २ ) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) सह १३७ या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी
नामे अली रझा परवेज इराणी हा क्रोम मॉल समोर , वानवडी सोलापुर रोड पुणे येथील कब्रस्तान मध्ये आलेला असून , त्याने अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व काळ्या रंगाचा फुल शर्ट घातलेला , रंगानेगोरा , दाढी राखलेली , केस मागे फिरविलेले असे वर्णन असलेला . अशी खात्रीशिर बातमी मिळालेने आम्ही मा वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री सुनिल पंधरकर सो यांना सदर मिळालेल्या बातमीची माहिती कळवून त्यांनी बातमी प्रमाणे कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने वरील स्टाफ सह वरील ठिकाणी जावुन आडबाजुला थावंबुन माहिती घेता बातमी प्रमाणे पाहिजे आरोपी हा मिळुन आल्याने त्यास सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून , त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता अली रा परवेज इराणी , वय ४८ वर्षे रा इराणी वस्ती शिवाजीनगर , पुणे असे सांगीतले त्यास विश्वासात घेऊन चौकशी तपास करता तो मुंब्रा पोलीस स्टेशन ठाणे शहर गुर नं . १४० / २००७ भादवि क १४३ , १४७ , १४९ , ३२३ , ३७० , ३६४ , ४२७ , ५०६ ( २ ) महाराष्ट्र पोलीस कर क ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हात फरारी आहे असे निष्पन्न झाले आहे . सदरील आरोपीस आहे त्या परिस्थीतीत ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून सदर आरोपीला पुढील कार्यवाही करीता
मुंब्रा पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आलेला आहे.
पो नि सुनील पंधरकर
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२,गुन्हे शाखा,पुणे शहर.
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526