समर्थ पोलीस स्टेशनची.पहिल्या दिवशी बी टी सहाणी शाळेला मार्गदर्शन.

दिनांक ०४/१०/२०२१ समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर कोरोना नंतर पहिल्याच दिवशी शाळेत समर्थ पोलीसांनी घेतला इयत्ता १० वीचा वर्ग

दि . ०४/१०/२०२१ रोजी ११.३० ते १२.३० वा चे सुमारास पोलीस भरती पूर्व लेखी परिक्षेच्या अनुषंगाने वपोनि श्री विष्णु ताम्हाणे , पोहवा जितेंद्र पवार , पो . शि . बेळगे , पोशि सागर हराळ असे समर्थ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेली बी टी सहाणी माध्यमिक शाळा , भवानी पेठ , पुणे या ठिकाणी पोलीस भरती • परिक्षा केंद्रास भेट दिली . त्यावेळी त्याठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश पेशवानी यांचेसह परिक्षा हॉलची पाहणी करीत असताना कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर ( सुमारे दिड वर्षानंतर ) आज शाळा सुरु झाल्याने शाळेचा प्रथमच दिवस असुन , इयत्ता १० वीच्या वर्गाला भेट दिली . शाळेचे प्राचार्य श्री सुरेश पेशवानी यांनी वपोनि श्री ताम्हाणे यांना वर्गातील विद्यार्थीनींना मार्गदर्शन करणेबाबत विनंती केल्याने श्री ताम्हणे यांनी मार्गदर्शन करीत असताना रिल लाईफ ( पडद्यावरील जीवन ) व रियल लाईफ ( खरे जीवन ) यातील फरक सांगुन जीवनाचे वास्तवाबाबत माहिती सांगितली . त्याचबरोबर आजची शाळकरी मुले ऑनलाईन शिक्षणाच्या सबबीखाली मोबाईलच्या आहारी जात असल्याने त्याचे होत असलेले दुष्परीणामबाबत माहिती विषद केली . तसेच महिला व मुली यांचेवर होणारे अत्याचार यावर मात करणेसाठी घ्यावयाची दक्षता व त्याबाबत कसा प्रतिबंध करावयाचा याबाबत मार्गदर्शन केले . सदृढ पिढी घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक असुन , डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम यांचे ” अग्नीपंख ‘ व ” असे घडवा तुमचे भविष्य ‘ हि पुस्तके वाचावीत जेणेकरुन तुमचे आयुष्यातील ध्येय साध्य करणेसाठी उपयुक्त हाईल . कोरोनामुळे बरेच मुले व पालक यांचेत नैराश्य येत आहे , त्यावर मात करणे गरजेचे असुन , नैराश्य आल्यास मुलांची मानसिकता बिडघुन जाते , अशावेळी नैराश्यावर मात करणेसाठी डॉ . दत्ता कोहिनकर यांचे ” मनाची मशागत ” हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल , असे सांगितले . पोलीसकाका मुलांना शिकवत आहेत याचे मुलांना विशेष कुतुहुल वाटले व पोलीसांनी घेतलेला वर्ग मुलांना चांगल्यारितीने आवडला .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *