बनावट स्वाक्षरी करून ‘ शिपाई ‘ पदावर नियुक्तीचे बनावट पत्र.(PUNE PMC).

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१७/०६/२०२२ PMC NEWS PUNE:

पुणे महापालिका आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करून ‘ शिपाई ‘ पदावर नियुक्तीचे बनावट पत्र ; महापालिका प्रशासन बोगस एजंटांवर तत्काळ गुन्हे दाखल करणार – रविंद्र बिनवडे , अतिरिक्त महापालिका आयुक्त.

पुणे : PMC News | महापालिका आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन एकाला ‘ शिपाई ‘ पदासाठी नियुक्ती पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . या बदल्यात संबधिताने तीन लाख रुपये घेतल्याचे निदर्शनास आल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत . याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली .

अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले , की आज सकाळी एक व्यक्ति शिपाई पदावर नियुक्ती झाल्याची ऑर्डर घेउन कार्यालयात आला . त्यावेळी त्याच्याकडील ऑर्डर बनावट असल्याचे निदर्शनास आले .नियुक्तीपत्रावर मागीलवर्षाची तारीख आहे . या नियुक्तीपत्रावर तीन वर्षांपुर्वी महापालिकेतून बदलून गेलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह बिनवडे आणि सध्याचे आयुक्त विक्रम कुमार यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे तत्काळ लक्षात आले . संबधितांकडे चौकशी केल्यावर

गायकवाड नावाच्या व्यक्तीने या नोकरीसाठी संबधिताकडून ३ लाख रुपये त्याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले आहेत . महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याची गंभीर दखल घेतली असून तातडीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .

यापुर्वीही महापालिकेत नोकरीच्या अमिषाने तीन युवकांची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे . जानेवारी महिन्यांत उघडकीस आलेल्या या प्रकरणामध्ये महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका कर्मचाऱ्याने अनुकंपा तत्वावरील वारसा हक्काने नोकऱ्या मिळवून देण्याचे अमिष दाखवून तीन युवकांकडून १० लाख रुपये घेतले . सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या नावे कोथरूड क्षेत्रिय कार्यालयातील नियुक्तीपत्र दिली . परंतू या नियुक्ती पत्रांवरील मुठे यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली . परंतू सहा महिने उलटले तरी याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही . अशातच आज आणखी एक घटना उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे .

महापालिकेमध्ये पुढील महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार आहे . यासाठी जाहिरात काढून एका एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेउनच पारदर्शकपणे भरती केली जाणार आहे . युवकांनी खाजगी व्यक्तींच्या अमिषाला बळी पडून कुठलाही चुकीचा मार्ग अवलंबू नये . बनावट नियुक्तीपत्राबाबत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी सांगितले .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *