फरासखाना पोलीस स्टेशन,आरोपी निष्षन करून त्यांना गुजरात येथुन ताब्यात घेतले

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -०३ / ०८ / २०२१ फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे शहर एक दिवसात बेवारस इसमाचे खुनाचे गुन्ह्यातील आरोपी निष्षन करून त्यांना गुजरात येथुन ताब्यात घेतले ,

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

दिनांक २७/०७/२०२१ रोजी सकाळी ०७.०० वाचे सुमारास एकता मेडीकलचे समोर रोडचे बाजुला , शाहीर अमर शेखचौक , मंगळवार पेठ , पुणे येथे एक देवारस मयत इसम , वय ३५ वर्षे , रा . पत्ता माहिती नाही हा बेशुध्द अवस्थेत पडला असल्याची खबर फरासखाना पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाल्याने लागलीच फरासखाना पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन त्या मयतास पुढील औषधोपचार कामी ससुन हॉस्पीटल येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले . त्याचे मयत बॉडीचे शवविच्छेदन आले असता त्यास मरण हे ” Death due to head injury associated with multiple . blunt injuries over body ” याने आले असल्याचे नमुद केले होते त्याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नं . ७२/२०२१ सी . आर . पी . सी . कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले . सदर मयताचे मरणामध्ये काही घातपात असल्याचा संशय आल्याने लागलीच राजेंद्र लांडगे , वरीष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे यांनी फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील , व मनोज अभंग यांना मयताचा तपास करण्यासाठी रवाना केले . त्यानुसार त्यांनी मयता बाबत तपास करता त्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सदर मयतास रात्री १२.०० वाचे सुमारास शाहीर अमर शेखचौकात छत्री विकणारे दोन पारधी इसमांनी मयतास काठीने डोक्यात , पाठीवर , पायावर मारहाण केली असल्याचे सांगितले . त्यामुळे सदर ठिकाणचे सी . सी . टी . व्ही . कॅमे – यांची पोलीस अंमलदार आकाश वाल्मीकी , अभिनय चौधरी , वैभव स्वामी , ऋषीकेश दिधे यांनी बारकाईने पाहणी केली असता , त्यामध्ये शाहिर अमर चौका मध्ये रेल्वे कॉलनीचे बाजुस असलेल्या फुटपाथवर राहत असलेल्या पारधी लोकांचे तंबु मधुन दोन इसम काठीसह बाहेर येवून सदर काठीने अनोळखी बेघर मयत इसमास मारहाण करताना दिसुन आले . त्यावरुन सदर मयतास दोन अज्ञात इसमांनी मारहाण करुन त्यास जिवे ठार मारले असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने .

सहाय्यक पोलीस निरीक्षक , मनोज अभंग यांनी स्वतः फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि १३२/२०२१ भादंवि कलम ३०२,३४ . महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) सहकलम १३५ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे , दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन आरोपीतांचा मोबाईल नंबर प्राप्त झाल्याने त्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणा वरुन ते सुरत , गुजरात येथे असल्याची माहीती त्यांना मिळाली .

त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील , पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी , आकाश वाल्मीकी , अभिनय चौधरी , वैभव स्वामी , ऋषीकेश दिघे यांनी सदर आरोपीतांचा दिल्ली चौक , सुरत , गुजरात येथे जावुन शोध घेतला असताते मिळुन आले . त्यावेळी त्या आरोपीतांची नावे

१ ) सीताराम रामकरण , ( बागरी ) . वय ३५ वर्षे . रा , जि.कोटा , गावदि गोट , पोलीस स्टेशन सांघोत . राज्य राजस्थान

२ ) एक विधी संघर्षीत बालक असल्याचे समजले त्यावेळी सदर आरोपीतांना महीदरपुर पोलीस स्टेशन , सुरत , गुजरात

येथुन ताब्यात घेवुन फरासखाना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्यांना नमुद गुन्हयामध्ये आरोपी क्रमांक १ यास अटक केली असुन . आरोपी क्रमांक २ हा विधी संघर्षीत बालक असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे . दाखल गुन्हयाचा

पुढील तपास सुशिल बोबडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक , फरासखाना पोलीस स्टेशन , पुणे हे करीत आहेत .

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता मा.पोलीस सह आयुक्त , पुणे शहर डॉ . रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर . डॉ संजय शिंदे , मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ डॉ . प्रियंका नारनवरे , मा सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री.सतिश गोवेकर , यांचे मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , अभिजीत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक , मनोज अभंग सहाय्यक पोलीस निरीक्षक , सुशील बोबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक , महेंद्र कांबळे , पोलीस उप निरीक्षक , पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी , आकाश वाल्मीकी , अभिनय चौधरी , सचिन सरपाले , वैभव स्वामी , ऋषीकेश दिघे , शरद वाकसे रिजवान जिनेडी , मोहन दळवी राकेश क्षीरसागर सचिन खाडे , तुषार खडके . पंकज देशमुख , अकबर कुरणे यांच्या पथकाने केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *