गुन्हे शाखा युनिट -३ ची कारवाई

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – ०३/०८/२०२१ गुन्हे शाखा युनिट -३ , पुणे शहर रेकॉर्डवरिल गुन्हेगाराकडून एक गावठी कट्टा व १ काडतुसे जप्त , गुन्हे शाखेची कारवाई

दि .०१ / ०८ / २०२१ रोजी युनिट -३ चे पथक उत्तमनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना पो.हवा . संतोष क्षिरसागर यांना मिळालेल्या बातमीवरुन इसम नामे संतोष यशवंत शिंदे वय २६ वर्षे रा .१३ , ताडीवाला रोड , ताडीवाला चौकीचे बाजुला , बंडगार्डन , पुणे . यास महालक्ष्मी गार्डन शेजारी एन डी ए रोड उत्तमनगर पुणे येथे रोडवर पुणे येथून ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून एक लोखंडी धातूचा गावठी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊंड असा ४०,४०० / – रुपयेचा माल हस्तगत करण्यात आला असून त्याचे विरुध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं .१८२ / २०२१ आर्म अॅक्ट कलम ३ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याचेवर यापुर्वी बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत .

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त श्री.अशोक मोराळे गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अभय महाजन , पोलीस उपनिरीक्षक दतात्रय काळे , सहा.पोलीस फौजदार निंबाळकर , पोहवा.संतोष क्षिरसागर , पोना नेवसे , पोशि क्षिरसागर पोशि कटटे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *