फोरव्हिलर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी,३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.apcs.news

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

 

Pune Crime News | Inter-state gang stealing expensive four-wheelers busted by Crime Branch, goods worth Rs 35 lakh seized

 CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

X-PAD डिव्हाइसच्या मदतीने बनावट चावी तयार करुन करत होते कारची चोरी.फोरव्हिलर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ ची कामगिरी.लोणीकंद पोलीस ठाणे गु र क्र ६१८ /२३ आयपीसी कलम ३७९ या गुन्ह्याच्या समांतर तपासामध्ये ADS2 चे अंमलदार संदिप येळे आणि अमोल सरतापे यांनी CCTV फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषण चे मदतीने अथक परिश्रम घेत चार चाकी वाहन (फाॅर्चुनर) चोरी गुन्ह्यामध्ये आरोपी.१) मनोज महेंद्र परिहार.२) राजेश राधेश्याम पंडित.३)इस्माईल शेफरखान सर्व रा. आग्रा , दिल्ली या तिघांना चोरीस गेलेली कारसह ताब्यात घेतले.

पुणे :ऑनलाइन – (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

.शहरातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक फॉर्च्यूनर कार चोरीला गेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करुन पोलिसांनी गुन्ह्यात चोरीला गेलेल्या कारसह ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांना शहरामध्ये वाहन चोरी करण्यास मदत करणाऱ्या गोरक्षनाथ साहेबराव साळवे (रा .काळेवाडी फाटा रहाटणी पुणे) याला अटक केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात हद्दीतून फॉर्च्यूनर गाडी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार संदीप येळे आणि अमोल सरतापे यांनी परिसरातील सीसीटीव्ही तापसले. तसेच तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी दरम्यान गुन्ह्यामध्ये स्थानिक सराईत गुन्हेगाराचा समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी गोरक्षनाथ साळवे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपींनी X-PAD डिव्हाइसच्या मदतीने बनावट चावी तयार करुन कारची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर नोएडा येथे वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर त्यांना मदत करणारा पुण्यातील सराईत गुन्हेगार गोरक्षनाथ साळवे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून लोणीकंद आणि गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपींकडून लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फॉर्च्युनर आणि गंगापूर पोलिस स्टेशन नाशिक गु र क्र २००/२३ कलम ३७९ चोरीस गेले वाहन INNOVA CRYSTA Car. असा एकूण ३५,००,०००-/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील , तीन डोंगल, दीड लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रॉनिक्स चावी तयार करण्याचे पॅड, तीन मोबाईल, जप्त केला आहे. आरोपी हे X-PAD डिव्हाईस चे साह्याने Key प्रोग्रॅम चोरून जागीच डूप्लीकेट चावी तयार करून वाहन चोरी करत होते.

सदरची उल्लेखनीय कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री.रितेश कुमार सर,मा.सह. पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक सर,मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली सहा.पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पोलीस अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, राजेश लोखंडे,विनायक रामाणे, दत्तात्रेय खरपुडे,, सुदेश सपकाळ, गणेश लोखंडे, विक्रांत सासवडकर, राहुल इंगळे, अमोल सरतापे, संदिप येळे, विनायक येवले यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *