पुण्यात हजारो रुग्ण आढळले, काळजी घ्या.राज्यात डोळ्यांच्या साथीचे लाखो रुग्णांनात वाढ.apcs.news

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुण्यात हजारो रुग्ण आढळले, काळजी घ्या.राज्यात डोळ्यांच्या साथीचे लाखो रुग्णांनात वाढ.

पुणे,दि.१४ :- महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आता वाढत चालली आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात ही साथ वाढली आहे.

डोळे येण्याची साथ राज्यभरात मोठ्या  प्रमाणात सुरू आहे. रुग्णसंख्या सुमारे चार लाखांपेक्षा ही अधिक पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर पुणे, जळगाव, नांदेड आणि चंद्रपूरमध्ये प्रमाण जास्त आहे.विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून  रुग्णसंख्येत तब्बल काही लाखांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ दिवसेंदिवस आणखी वाढताना दिसत आहे. 
राज्यात ११ ऑगस्टपर्यंत डोळे येण्याचे सर्वाधिक ४४ हजार ३९८ रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ३२ हजार ४६२, जळगाव २५ हजार ७०९, नांदेड २२ हजार ८६० आणि चंद्रपूर १७ हजार ८५१ अशी रुग्णसंख्या आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत ८ हजार ३५७ रुग्ण आढळले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ६ हजार ७२१ रुग्ण सापडले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या ३ हजार ४९० आहे.

काळजी काय घ्यावी? वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, वारंवार हात धुणे, डोळय़ांना स्पर्श करणे टाळणे, रुग्णांचे घरातच विलगीकरण, परिसर स्वच्छता ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे डोळे येणे हा आजार मुख्यत्वे ॲडिनो विषाणूमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:चे घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

आरोग्य विभागाकडून उपाययोजना काय? आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून डोळे येण्याची साथ सुरू असलेल्या भागात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. साथ असलेल्या भागात शाळेतील मुलांची डोळ्याची तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिली.

अशी असतात लक्षणे ,

डोळे येण्याची लक्षणे कोणती?

  • 1) डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे
  • 2) डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
  • 3) डोळे सतत चोळावेसे वाटणे
  • 4) दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
  • 5) डोळ्यांना सतत खाज येणे
  • 6) पापण्या एकमेकांना चिकटणे

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?

  • डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुत राहावे
  • नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे.
  • डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा
  • उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *