पुण्यातील शाळेच्या समोर पकडला गांजा, एकाला अटक तर एकजण फरार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथे एका नामांकित शाळेसमोर गांजा विक्री करणाऱ्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. नागरिकांना अशा अवैध प्रकारांबाबत माहिती मिळते तर पोलिसांना ही माहिती का मिळत नाही असा सवाल करण्यात येत आहे.
(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज समोर राजारोसपणे विक्री केला जात होता गांजा, आजाद समाज पार्टी ने केला पर्दाफाश.
पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील विमाननगर येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या समोरच नागरिकांनी सोळा किलो गांजा पकडून दिला. पानटपरीत किंवा अन्य दुकानांमध्ये ‘बडीशेप’ची किरकोळ विक्री होते, त्याप्रमाणे संबंधित शैक्षणिक संस्थेबाहेर गांजाची विक्री करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांनी या प्रकरणी एकाला पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अजय सोपान सावंत (वय ५१, रा. टिंगरेनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार गणेश मधुकर वाळुंजकर हा फरार आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी शैलेश नाईक यांनी तक्रार दिली आहे. नवीन विमानतळ रस्त्यावर संजय पार्क मधील एका मोकळ्या जागेतील खोलीत एक जण अमली पदार्थ बाळगून विक्री करत असल्याची माहिती आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी विमानतळ पोलिस ठाणे गाठून गांजा विक्रीची माहिती पोलिसांना दिली.

त्यानतंर विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे, संगीता माळी,सहायक निरीक्षक विजय चंदन आणि उपनिरीक्षक रवींद्र वारंगुळे आणि कर्मचारी व पक्षाचे कार्यकर्त्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका पत्र्याच्या खोलीत आरोपी सावंत याच्याकडून भरलेले पोते सापडून आले. पोलिसांनी पंचाच्या समक्ष पोते उघडल्यावर त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा सापडून आला. त्यामुळे पोलिसांनी गांजा जप्त करून आरोपीला अटक केली.

जप्त केलेला गांजा सोळा किलो असून, गांजाचा मालक फरार झाला आहे. आरोपी मिळाल्यावर यासंबंधीची अधिक माहिती मिळू शकेल. तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली. एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यावर विमानतळ पोलिसांनी विमाननगर परिसरातून सोळा किलो गांजा पकडला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून, सखोल चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in